शिवसेनेच्या (उबाठा) वतीने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा जाहीर निषेध
◻️ काँग्रेसप्रमाणे भाजपला देखील घरी बसवण्याची वेळ आली - अमर कतारी
संगमनेर LIVE | बुधवार दि. २३ एप्रिल रोजी शिवसेना (उबाठा) च्या वतीने जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी शिवसैनिकांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या जोरदार घोषणा दिल्या. तसेच सदर हल्ल्याची जबाबदारी स्वीकारून अमित शहा यांनी राजीनामा द्यावा अशी ही मागणी शिवसैनिकांच्या वतीने करण्यात आली.
पूर्वी काँग्रेस काळात अनेक वेळा असे दहशतवादी हल्ले होत होते. या दहशतवादी हल्ल्याला वैतागूनच लोकांनी काँग्रेसला घरी बसवले आणि एक हिंदुत्ववादी सरकार उदयास आणले. भारतात शांतता व सुव्यवस्था राहावी म्हणून भारतीय नागरिकांनी भाजप सरकार निवडून दिले भाजपच्या काळात देखील पुलवामा सारखा भयंकर हल्ला झाला आणि त्यानंतर आता पहलगाम सारखा दहशतवादी हल्ला झाला या प्रकारचे हल्ले होत असतील तर ज्या प्रकारे लोकांनी काँग्रेसला घरी बसवले तर आता भाजपला देखील घरी बसवायची वेळ आली आहे. असे मत शिवसेनेचे माजी शहरप्रमुख अमर कतारी यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी उप जिल्हाप्रमुख अशोक सातपुते यांनी अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली व पाकिस्तानचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. महिला आघाडी तालुकाप्रमुख शितलताई हासे यांनी सुद्धा आपल्या भावना तीव्र शब्दात व्यक्त करत पाकिस्तानचा निषेध केला.
अजीज मोमीन व आसिफ भाई तांबोळी यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या व पाकिस्तानच्या क्रूर हल्ल्याला जशास तसे उत्तर द्यावे. आम्ही भारतीय म्हणून सदैव सोबत राहू व पाकिस्तानचा निषेध नोंदवला. यावेळी शहर प्रमुख पप्पू कानकाटे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले व पाकिस्तान मुर्दाबादच्या जोरदार घोषणा दिल्या.
अमित चव्हाण यांनी सुद्धा देशाची कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण करीत दहशतवाद्यांना जशास तसे उत्तर देण्याची मागणी केली. यावेळी अनेक शिवसैनिकांनी आपले मनोगत व्यक्त केले.
दरम्यान यावेळी माजी शहरप्रमुख अमर कतारी, अशोक सातपुते, जालिंदर लहामगे, अमित चव्हाण, पप्पू कानकाटे, शितलताई हासे, वैशालीताई वडतले, संभवशेठ लोढा, सदाशिव हासे, मुस्लिम मावळा अजीज मोमीन, इम्तियाज शेख, वेणुगोपाल लाहोटी, आसिफ तांबोळी, राजू सातपुते, विजय सातपुते, अमोल डुकरे, त्रिलोक कतारी, प्रशांत खजुरे, प्रकाश चोथवे, राहणे, प्रकाश गायकवाड, अमित फटांगरे आदि पदाधिकारी उपस्थित होते.