संगमनेर येथून ३ लाख ६० रुपये किंमतीचे बाराशे किलो गोमांस जप्त
◻️ संगमनेर शहर पोलीसांनी केली बुधवारी सकाळी कारवाई
संगमनेर LIVE | संगमनेर शहर पोलीसांनी बुधवारी सकाळी तब्बल ३ लाख ६० रुपये किंमतीचे १२०० किलो गोवंशीय जनावरांचे मांस जप्त करत कारवाई केली आहे. त्यामुळे संगमनेर शहरात मोठ्या प्रमाणात गोवंशीय जनावरांची कत्तल होत असल्याचे पुन्हा सिद्ध झाले.
बुधवारी दि. २३ एप्रिल २०२५ रोजी सकाळी संगमनेर शहर पोलीसांनी कादरी मशिदीच्या मागील बाजूस गल्ली क्रमांक १ मधील भारतनगर येथील एका वाड्यात कारवाई करत बंदी असलेले ३ लाख ६० रुपये किंमतीचे १२०० किलो गोवंशीय जनावरांचे मांस जप्त करून कारवाई केली. यावेळी पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख व सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर अभंग यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलीसांना कारवाईबाबत योग्य त्या सूचना दिल्या.
दरम्यान संगमनेर शहर पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई रोहिदास शिरसाठ यांनी फिर्याद दाखल केली असून आरोपी अदनान कुरेशी (वय - १९) यांच्यावर गुन्हा रजिस्टर नंबर ३४०/२०२५ नुसार बीएनएस कलम २७१, ३२५ सह महाराष्ट्र पशु संरक्षण सुधारणा अधिनियम १९९५ कलम ५ (क), ९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलीस हवालदार कानिफनाथ जाधव हे पुढील तपास करत आहे.