आस्मानी संकट ओढावलेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर आमदार खताळ यांची भेट
◻️ नुकसानग्रस्त शेती पिकांचे पंचनामे करा
◻️ तहसीलदार, कृषी अधिकारी आणि गटविकास अधिकाऱ्यांना दिले निर्देश
संगमनेर LIVE | मागील वेळेस तोंड पाहून पंचनामे केले होते. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नव्हती. मात्र, आता अधिकाऱ्यांनी खरोखर नुकसान झालेल्या शेतकऱ्याच्यां बांधावर जाऊन तात्काळ पंचनामे करावे. असे स्पष्ट निर्देश आमदार अमोल खताळ यांनी तहसीलदार, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी आणि पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना दिले.
संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ, धांदरफळ, मिर्झापूर, नांदुरी दुमाला, कौठे धांदरफळ, नांदूर खंदरमाळ आणि जांबुत या गावात अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर प्रत्यक्ष जाऊन आज गुरुवारी आमदार अमोल खताळ यांनी पाहणी केली. यावेळी प्रशासकीय अधिकारी समवेत होते. सर्वप्रथम कोठे धांदरफळ येथील निवृत्ती म्हतारबा घुले यांच्या दोन गायीवर वीज पडून दगावल्या होत्या. त्यांच्या गोठ्याला भेट देत पाहणी केली आणि तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले. यावेळी शासनाच्यावतीने सर्वोतोपरी मदत मिळवून देण्याची ग्वाही दिली.
नांदुरी दुमाला येथील जिल्हा परिषद शाळेच्या संरक्षक भिंतीवरती झाड पडून भिंत पडली त्या ठिकाणची आमदार खताळ यांनी पाहणी केली. तसेच याच गावातील नामदेव दगडू कोठवळ यांचा कांदा, राहुल दत्तू कवडे यांच्या काढणीस आलेल्या द्राक्ष बागेची, सुरेश काशिनाथ शेटे यांच्या कांदा पिकाची, शिवाजी मारुती शेटे आणि गजानन नेहे याच्यां डाळिंब बागेची त्यानी पाहणी केली.
त्याचंबरोबर मिर्झापूरचे गणेश वलवे यांचे टोमॅटो, शिवाजी रभाजी दिवटे यांची शेड नेट मधील सिमला मिरची, अशोक नाना वलवे यांचा ऊस धांदरफळ येथील बाबासाहेब भाऊ खताळ यांचा गहू, सावरगाव तळ येथील सोमनाथ शंकर थिटमे तसेच साहेबराव बाळाजी कचरे यांनी साठवून ठेवलेल्या कांदा, दत्तू गंगाधर शेळके व संतोष एकनाथ नेहे यांच्या शेतातील कांदा आणि उन्हाळी बाजरीच्या झालेल्या नुकसानीची पाहणी आमदार खताळ यांनी केली.
तसेच नांदूर खंदरमाळ आणि जांबुत येथील नुकसानग्रस्त भागाचे सुद्धा तात्काळ पंचनामे करण्यात यावे अशा सुचना अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी तहसीलदार धीरज मांजरे, नायब तहसीलदार सुभाष कदम, गटविकास अधिकारी राजेंद्र ठाकूर, उपविभागीय कृषी अधिकारी विलास गायकवाड, तालुका कृषी अधिकारी रेजा बोडके, शिवसेनेचे रामभाऊ राहणे, बादशहा गुंजाळ, नेताजी घुले, मारुती घुले, अँड. मीनानाथ कवडे, सोमनाथ नेहे, अनिल निळे, साहेबराव वलवे, संजय खताळ, कैलास गोडसे, उमेश कोकणे, बाळासाहेब शेटे, शरद नेहे, परसराम नेहे, बबन गाडे, बाळासाहेब थिटमे, लक्ष्मण नेहे, सुरेश भालेराव यांच्यासह मंडल कृषि अधिकारी पंकज कवाड, कृषी सहाय्यक भारती मोरे, कल्याणी धाडे, गंगाराम ढोले महसूलचे मंडलाधिकारी कामगार तलाठी व ग्राम सेवक यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.