गुन्हे शाखेकडून जिल्हयातील १५ अवैध दारू विक्रेत्यांवर छापे
◻️ आश्वी, घारगाव, लोणी व राहाता पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंदयावर केली कारवाई
◻️ ७८ हजार ३९० रुपयांचा मुद्देमाल पोलीसांकडून जप्त
संगमनेर LIVE | पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना जिल्ह्यामधील व्यावसायिकावर कारवाई करणेबाबत आदेश दिले होते.
त्यामुळे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे, बापुसाहेब फोलाणे, बिरप्पा करमल, गणेश लोंढे, पंकज व्यवहारे, बाळासाहेब नागरगोजे, सोमनाथ झांबरे, रविंद्र घुंगासे, किशोर शिरसाठ, विशाल तनपुरे, जालींदर माने, रणजीत जाधव, उमाकांत गावडे व महादेव भांड यांचे पथक तयार करून त्यांना आश्वी, घारगाव, लोणी व राहाता पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यावर कारवाई करणेबाबत सुचना दिल्या होत्या.
त्यानुसार दि. २७/०४/२०२५ रोजी पथकाने आश्वी, घारगाव, लोणी व राहाता पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध दारू विक्रेत्यांची माहिती काढुन १५ ठिकाणी छापे टाकुन कारण्यात आली आहे.
यावेळी अवैध दारू विक्रेत्यांविरूध्द आश्वी, घारगाव, लोणी व राहाता पोलीस ठाण्यात १५ गुन्हे दाखल करून आरोपीचे ताब्यातुन ७८ हजार ३९० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांमार्फत यापुढे देखील अवैध धंद्याविरुध्द कारवाई चालु राहणार असल्याची माहिती मिळाली आहे.
यामध्ये पोलीस स्टेशन निहाय आश्वी येथे ६ गुन्हे, घारगाव येथे ४ गुन्हे, लोणी येथे ३ गुन्हे, राहाता येथे २ गुन्हे असे एकुण १५ गुन्हे दाखल करत ७८ हजार ३९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दरम्यान ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.