तब्बल ३७ वर्षानंतर ‘..त्या’ विद्यार्थ्याची झाली पुन्हा हजेरी!
◻️ त्यावेळचे हुशार पण, खोडकर विद्यार्थ्याचा आज समाजातील नावलौकिक पाहुन सेवानिवृत्त शिक्षक भारावले
◻️ सन १९८८ सालच्या आश्वी इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्याचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न
संगमनेर LIVE (आश्वी) | आज आम्ही घडवलेले विद्यार्थी समाजमध्ये अनेक पदावर काम करतात हे एकुण मन प्रसन्न झाले. सेवानिवृत्ती नंतरच्या काळामध्ये भू-गर्भातील पाणी शोधण्याच्या छदाला पुढे घेऊन जात असताना आज पर्यत अनेक कोरडवाहु विहीरीमध्ये पाणी आले तर अनेक वर्षापासुन पाण्यापासुन वंचित राहिलेल्या लोकांना यामुळे न्याय देता आला. आज माला देसाई सर ऐवजी पाणाडी देसाई सर म्हणून ओळख मिळाली त्यामागे आश्वी बुद्रुक गावचा मोठा हातभार असल्याचे सेवानिवृत्त शिक्षक नारायणराव देसाई यांनी सांगितले.
संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील रयत शिक्षण संस्थेच्या आश्वी इंग्लिश स्कुलच्या सन १९८८ साली शिक्षण घेतलेल्या १० वीच्या विद्यार्थ्याचा नुकताच ३७ वर्षानंतर स्नेह मेळावा उत्साहात संपन्न झाला. यावेळी सुरवातीला सेवानिवृत्त प्राचार्य सोमनाथ दिघे यांनी उपस्थित विद्यार्थीची हजेरी घेतली.
याप्रसंगी सेवानिवृत्त शिक्षक नारायणराव देसाई, सेवानिवृत्त प्राचार्य सोमनाथ दिघे, बी. एम. ठुबे, जगन्नाथ गमे, नेहे, प्राचार्य देवराम वडीतके, राजेंद्र शहाणे तसेच शिक्षक आणि कर्मचारी किसन उदावंत उपस्थित होते. यावेळी १९८८ साली इयत्ता १० वीच्या वर्गातील अकाली निधन झालेले विद्यार्थी दिवंगत तुकाराम ताजणे, प्रशांत दाईगडे, लक्ष्मण आंधळे, रंजना आंधळे, सुनिल खेमनर यांना भावविभोर होत श्रध्दाजंली अर्पण केली.
पुढे बोलताना सेवानिवृत्त शिक्षक नारायणराव देसाई म्हणाले की, दिवसे दिवस सामजातील एकोपा कमी होत चालला आहे. या गावाने माझ्यावर जिवापाड प्रेम केले. त्यामुळे आज ही मला आश्वी गाव सोडण्याचा तो प्रसंग आठवला ही मन भरून येते. या शाळेमध्ये मी सन १९८१ ते १९९५ पर्यत विद्यार्थी घडवण्याची संधी मिळाली यांचा आज आनंद होत असल्याचे सांगितले. तसेच त्यावेळचे हुशार पण, खोडकर विद्यार्थ्याचा आज समाजातील नावलौकिक पाहुन भारावले असल्याचे सांगताना त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता.
माजी विद्यार्थी आणि दै. लोकसत्ताचे पत्रकार सिताराम चांडे म्हणाले की, लहानपणा पासुन राजकारण व समाजकारणीची आवड होती. त्यामुळे विविध विषयावर लेख लिहिण्याची आवड ओळखून पद्मश्री विखे पाटील महाविद्यालय लोणी येथील स्वर्गीय प्रा. शंकरराव दिघे यांनी ११ वीला प्रवेश घेतल्यानंतर मला पत्रकारिता करण्याबाबत मार्गदर्शन केले. बीएससी शिक्षण पुर्ण झाल्यानंतर नौकरी करण्याऐवजी पत्रकारीता सुरू केली. आज जवळपास २५ वर्षाहून अधिक काळ मी पत्रकारीता क्षेत्रामध्ये काम करत असल्याचे श्रेयात माझ्या शाळेचा व शिक्षकांचा सिंहाचा वाटा असल्याची भावना बोलून दाखवली.
आम्ही किती मोठे झालो तर आमच्या गुरूजनासाठी आम्ही तेच शाळेतील विद्यार्थी आहोत. आज ही तुमची शाबासकी ही आमच्यासाठी प्रेरणादाई आहे व उद्या ही असेल. सिव्हील इंजिनियरीग नंतर पुणे, मुंबई, चेन्नई, बग्लोर सह भारतमधील अनेक मोठ्या शहरामध्ये माझ्या कंपनीचे कामे सुरू आहेत. केवळ शाळेतील शिक्षकांच्या शिस्तीमुळे माझ्या जीवणाचे सोने झाले. अशा शब्दांत माजी विद्यार्थी आणि एमडीरास प्रोजेक्ट मॅनेजमेंटचे इंजिनियर अनिल हिंगे यांनी भावना व्यक्त केल्या.
दरम्यान याप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक सुकदेव खेमनर, इंजिनिअर अनिल हिंगे, अशोक बोर्डे, भागवत खेमनर, दिपक घोलप, राजेंद्र मंडलिक, जगदीश तापडीया, संतोष रासने, भरत सांगळे, नंदु लाहोटी, राजेंद्र डेगंळे, अरुण कदम, संजय डोखे, अनिता मुळे, नंदा बोऱ्हाडे, सुनिता गोरे, प्रियांका भुसाळ, नलिनी आंधळे, संगिता ताजणे आदि विद्यार्थ्यासह त्याचे मुलं आणि नांतवडे उपस्थित होते.