संगमनेर शेतकी संघाचा पीक संवर्धन विभाग सुरू

संगमनेर Live
0
संगमनेर शेतकी संघाचा पीक संवर्धन विभाग सुरू

◻️ शेतकी संघाने कायम शेतकऱ्यांचा विश्वास सार्थ ठरवला -  इंद्रजीत थोरात

संगमनेर LIVE | संगमनेर शेतकी संघ ही सहकारातील मातृसंस्था असून लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली गुणवत्ता, पारदर्शकता, योग्य भाव या सर्व गोष्टींमुळे शेतकऱ्यांची कायम शेतकी संघास प्रथम पसंती राहिली आहे. शेतकी संघाने ही शेतकऱ्यांचा व जनतेचा हा विश्वास सार्थ ठरवला असल्याचे प्रतिपादन थोरात कारखान्याचे  संचालक इंद्रजीत थोरात यांनी केले.

संगमनेर शेतकी संघाच्या नव्याने सुरू करण्यात आलेल्या पीक संवर्धन विभागाच्या शाखेच्या उद्घाटनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. डॉ. जयश्री थोरात, संपतराव डोंगरे, सुनील कडलक, पांडुरंग घुले, सचिन दिघे, अनिल कांदळकर, अजय फटांगरे, अनिल शिंदे, डॉ. नितीन भांड, रामदास तांबडे, अनिल थोरात आदी यावेळी उपस्थित होते.

इंद्रजीत थोरात म्हणाले की, संगमनेर शेतकी संघ ही सहकारातील मातृसंस्था आहे. राज्यातील अनेक शेतकी संघ बंद पडले आहे‌. मात्र, संगमनेरचा शेती संघ दिमाखात उभा आहे. शेतकऱ्यांना रासायनिक खते व औषधे एकाच ठिकाणी मिळावे म्हणून संगमनेर शेतकी संघाने पीक संवर्धन विभागाची सुरुवात केली आहे. यामुळे दर्जेदार व नामांकित कंपन्यांची शेती उपयोगी रासायनिक खते व कीटकनाशके आता योग्य दरात येथे उपलब्ध होणार आहे. तरी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या की, शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी लागणारी बी - बियाणे खते व औषधे शेतकी संघामार्फत योग्य दरात पुरवली जातात. सहकार जपणे ही सर्वांची जबाबदारी आहे. शेतकी संघाने गुणवत्तेच्या बाबतीत आपला लौकिक कायम ठेवला आहे. तरी याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले.

यावेळी साहेबराव बारवे, बाळकृष्ण होडगर, ज्ञानेश्वर सांगळे, किरण नवले, भाऊसाहेब नवले, संतोष नागरे, तुकाराम कोठवळ, शिवाजी आहेर, प्रभाकर सोनवणे, महादू खेमनर, संजय शिरसागर, भास्कर गोपाळे, विनायक काळे, भरत काळे उपस्थित होते.

दरम्यान कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन दिघे यांनी केले. प्रास्ताविक संपतराव डोंगरे यांनी तर, आभार अनिल थोरात यांनी मानले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !