पाणी सोडण्याचे श्रेय नामदार विखे आणि आमदार खताळ यांचे - रोहिदास गुंजाळ
◻️ निळवंडे कालव्याला पाणी सोडण्याचे श्रेय इतरानी घेऊ नये
संगमनेर LIVE | गुंजाळवाडी गावातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत व पाण्याबाबत विरोधकांनी राजकारण करू नये. निळवंडे धरणातून उजव्या आणि डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याचे योगदान पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांचेच आहे. त्यामुळे कोणीही श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये. अशी माहिती भाजपचे रोहिदास गुंजाळ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवली आहे.
या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, निळवंडे धरणातून उजवा व डाव्या कालव्याला जलसंपदा मंत्री व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आदेशित केले प्रमाणे २० एप्रिल २०२५ रोजी कालव्याद्वारे उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले. हा कालवा संगमनेर तालुक्यातून पुढे लाभ क्षेत्रात जात असून संगमनेर तालुक्यातील लाभ क्षेत्रातील गावांसाठी शेतकऱ्यांना पिके व जनावरांचा चारा यासाठी उन्हाळ्यात पाण्याचा तुटवडा भासू नये म्हणून आ. अमोल खताळ पाटील यांनी तालुक्यातील लाभ क्षेत्रातील गावांना कालव्यातून आवश्यक तेथे पाणी देण्याच्या सुचना दिल्या आहेत.
त्यामुळे गुंजाळवाडी गावातील कार्यकर्त्यानी आमदार खताळ यांची भेट घेऊन गुंजाळवाडी व वेल्हाळे हद्दीतील असणारे लहान - मोठे बंधारे भरून मिळावे यासाठी विनंती केली होती. त्यानंतर आमदार खताळ यांनी कार्यकर्त्याचा सन्मान ठेवून लाभ क्षेत्रातील सर्व बंधारे आणि पाझर तलाव तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतीसाठी पाणी सोडण्याबाबत निर्देश पाटबंधारे विभागाला दिले. त्यामुळे पालकमंत्री विखे पाटील आणि आमदार खताळ यांचे कार्यकर्त्यासह शेतकऱ्यांनी आभार मानले असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकातून रोहिदास गुंजाळ यांनी दिली.