ठाकरेंच्या शिवसेनेचे संगमनेर शहरात अवैध धंद्या विरोधात घंटानाद आंदोलन
◻️ पोलीस प्रशासनाचा सकारात्मक प्रतिसाद ; अवैध धंद्यावरील कारवाईला सुरुवात
संगमनेर LIVE | संगमनेर शहर व तालुक्यातील बऱ्याच ठिकाणी मटका, अवैध मद्य, गुटखा विक्री, वाळू तस्करी, जुगार तसेच कत्तलखान्यांच्या विरोधात पोलीस प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनही यावर कुठलीही कारवाई होत नसल्याचे सांगत शिवसेनेचे (उबाठा) माजी शहरप्रमुख अमर कतारी यांनी घंटानाद आंदोलनाचे आयोजन केले होते. यावेळी शिवसैनिकानी पोलीस स्टेशन परिसरात जोरदार घोषणाबाजी करत घंटानाद आंदोलन केले.
अवैध धंद्यांच्यामुळे दोन गटात तणाव निर्माण होऊन शहरात अशांतता होते. म्हणून अवैध धंदे त्वरित बंद करण्याची मागणी युवा सेना जिल्हाप्रमुख अमित चव्हाण यांनी केली. तसेच याचे पर्यावसान वादात होते व कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. तसेच या अवैध धंद्याना पाठीशी घातल्याने अवैध धंदा करणारे व्यवसायिक हे दादागिरी करत नागरिकांना वेठीस धरतात असे मत युवासेना शहर प्रमुख गोविंद नागरे यांनी व्यक्त केले. गुन्हेगारी व व्यसनाधीनतेचे प्रमाण यामुळे वाढते आहे. त्यामुळे मटका, जुगार, वाळू तसेच मद्य व गुटखा विक्री बंद करावी. यासाठी हे घंटानाद आंदोलन करण्यात आल्याची माहिती शिवसैनिकांनी दिली.
यावेळी नेहरू गार्डन ते शहर पोलीस ठाणे ह्या मार्गावरून घंटानाद करत शिवसैनिक व सर्वसामान्य नागरिकांनी अमर कतारी यांचे नेतृत्वात पोलीस ठाणे गाठत जोरदार घोषणाबाजी केली. पोलीस प्रशासनानेही आंदोलनाची दखल घेत तात्काळ पोलीस निरीक्षक यांनी उपस्थित आंदोलकांसोबत चर्चा करत निवेदन स्वीकारले.
पोलीसांनी यावेळी संगमनेर येथील बहुतांश अवैध व्यवसाय बंद झाले असून आजपासून ते स्वतः जातीने लक्ष घालून चोरून लपून सुरु असलेले अवैध धंदे पूर्णतः बंद करणार असल्याचे सांगितले. शहराचा फेरफटका मारला असून सर्व अवैध मटका दुकान बंद केल्याची माहिती दिली. निवेदन दिल्यानंतर आत्तापर्यंत २५ मटका व्यावसायिकांवर कारवाई केल्याचे देखील सांगितले. तसेच कुठेही बेकायदेशीर मद्य व गुटखा विक्री, मटका, जुगार अड्डे आणि कत्तलखाने इत्यादी अवैध धंदे सुरु असल्याचे दिसल्यास कळवण्याचे आवाहन केले. तर, आरोपीचा कोणतीही मुलाहिजा न ठेवता कठोर कारवाई करण्याचे आश्वासन पोलीसांनी उपस्थितांना दिले.
यावेळी अमित चव्हाण, राजू सातपुते, गोविंद नागरे, अमोल डुकरे, भाऊसाहेब हासे, प्रथमेश बेल्हेकर, प्रकाश गायकवाड, भाऊसाहेब वराळे, संभवशेठ लोढा, सचिन साळवे, अशोक बढे, प्रशांत खजूरे, इम्तियाज शेख, जेष्ठ शिवसैनिक बाबासाहेब मुसमाडे, सुखदेव कनसे, शुभम काळे, पंकज हासे, सुशांत कतारी, जानकीराम भडकवाड, विजय कोटकर, विजय सातपुते, दिपक सांळके, कृष्णा गायकवाड, महिला आघाडीच्या सुमित्रा खची, सपना देसाई, उज्वला म्हाळस, सुनंदा खिची, लक्मी खिची, राखी तडासम, गुड्डी पवार, दिशा कतारी, साधना पवार, गायत्री पवार, अशा धरम कतारी यासह अनेक महिला व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थिती होते.