संगमनेरचे अमोल पावसे ‘रक्तवीर पुरस्कारा’ने सन्मानित!
◻️ उत्तर प्रदेशचे आमदार भूपेश चोबे यांच्या उपस्थितीत झाला गौरव
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील अमोल रामचंद्र पावसे (हल्ली मुक्काम - गोगलगाव, ता. राहाता) यांचा उत्तर प्रदेशचे आमदार भूपेश चोबे यांच्या उपस्थितीत नुकताचं ब्लड डोनरचे उत्कृष्ट काम केल्याबद्दल दिल्या जाणाऱ्या ‘रक्तवीर पुरस्कारा’ने गौरव करण्यात आला. यावेळी त्यांना स्मृतिचिन्ह, सुवर्ण पदक आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
अमोल पावसे हे नियमितपणे गोरगरीब व सर्वसामान्य रुग्णांची ज्याला रक्ताची आवश्यकता असेल त्या रुग्णांना ताबडतोब आवश्यक ग्रुपचे रक्त उपलब्ध करून देतात. त्यांना या कामाबद्दल हा पुरस्कार देण्यात आला.
दरम्यान अमोल पावसे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.