इयत्ता १ लीच्या वर्गात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याची ट्रॅक्टरमधून मिरवणूक काढत स्वागत
◻️ शिबलापूर जिल्हापरिषद शाळेने ‘शाळा प्रवेशोत्सा’निमित्त काढलेल्या फेरीने वेधले नागरीकांचे लक्ष
◻️ शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याच्या पालकांची घरपट्टी व पाणीपट्टी माफ करण्याची उपसरपंच सुनील मुन्तोडे यांची ग्वाही
संगमनेर LIVE (आश्वी) | मागील दीड ते पावणेदोन महिन्यांपासून सुट्ट्यामुळे बंद असलेल्या शाळा सोमवार १६ जून पासून सुरू झाल्या आहेत. यावेळी शाळेच्या प्रांगणात पहिल्यांदाच पाऊल ठेवणाऱ्या पहिलीच्या चिमुकल्या विद्यार्थ्याची संगमनेर तालुक्यातील शिबलापूर येथील जिल्हापरिषद शाळेने ट्रॅक्टर - ट्रॉली मधून मिरवणूक काढली. यावेळी समवेत असलेल्या चिमुकल्या मुलीच्या तालबद्ध लेछीम पथकाने नागरीकांचे लक्ष वेधून घेतले होते. विशेष म्हणजे यावेळी या चिमुकल्यानी नव्या - कोऱ्या गणवेशाची नवलाई, पुस्तकांचा गंध अनुभवल्याचां आनंद चेहऱ्यावर दिसत होता.
नव्याने शाळेत प्रवेश घेतलेले चिमुकले सोमवारी सकाळीचं सर्वकाही आवरुण कोणी मित्रांसोबत, कोणी भावासोबत, कोणी वडील, कोणी आईचे बोट धरून शाळेत आले होते. यावेळी शिबलापूर जिल्हापरिषद शाळेच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक आणि शाळेच्या विविध समितीतील सर्व सदस्यांनी या चिमुकल्यांच्या स्वागतासाठी तयारी केली होती.
यावेळी इयत्ता पहिल्याच्या वर्गात प्रवेश घेतलेल्या चिमुकल्या विद्यार्थ्याची फुले, फुगे, नारळाच्या झावळ्यानी सजवलेल्या ट्रॅक्टर - ट्रॉली मधून सवाद्य मिरवणूक काढली. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थीनीचे लेझीम पथक लयबद्ध पद्धतीने वाजत गाजत चालले होते. यावेळी जिल्हापरिषद शाळेच्या सेवा सुविधांची माहिती शिक्षकांनी माहिती देत पालकांनी मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी जिल्हापरिषद शाळेत प्रवेश घ्यावा असे आवाहन केले.
या सुंदर स्वागत समारंभाच्या यशस्वीतेसाठी उपसंरपच सुनिल मुन्तोडे, राहुल मुन्तोडे, संजय (काळू) मुन्तोडे, प्रितम मुन्तोडे, बाळासाहेब कांबळे, शाळेच्या मुख्यध्यापिका सविता भुसाळ, बाळासाहेब वाकचौरे, सीताराम पिचड, हेमत मुठे, सोमनाथ मुन्तोडे, लहानभाऊ नागरे, सौ. पूनम मुन्तोडे, सौ. स्वाती गायकवाड, सौ. जया साळवे, तबसूम पठाण, डॉ. रोहीत मुन्तोडे, शुभम मुन्तोडे, करण पवार, अमोल मुन्तोडे, संस्कार मुन्तोडे, साहिल शेळके, गणेश जाधव, अन्वर शेख आदींसह पालक, शालेय समितीचे सर्व सदसयांनी प्रयत्न केले.
दरम्यान यानंतर या सर्व चिमुकल्याचे गुलाबपुष्प देऊन शाळेत स्वागत करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्याना प्रातिनिधिक स्वरूपात शालेय गणवेश, पुस्तके आणि बुटांचे वाटप केले.
याप्रसंगी बोलतांना सामाजिक कार्यकर्ते संजय मुन्तोंडे यांनी दिवसेंदिवस जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्याची पट संख्या कमी होत असल्याबाबत चिंता व्यक्त केली. तर, जिल्हापरिषद शाळेत दर्जेदार शिक्षण मिळत असून इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या दिखाव्याला पालकांनी भुलू नये. मातृभाषेतील शिक्षणामुळे विद्यार्थ्याना शिक्षणाबरोबरच जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन देखील मिळत असतो. त्यामुळे गावातील पालकांनी आपल्या पाल्याचा जिल्हापरिषद शाळेत प्रवेश घेण्याचे आवाहन केले.
राज्यात आणि देशात नावलौकिक मिळवलेल्या बहुतांश व्यक्ती या जिल्हापरिषद अथवा मराठी माध्यमाच्या शाळेत शिकूनचं मोठ्या झाल्या आहेत. त्यामुळे पालकांनी मराठी माध्यमाच्या शाळेविषयी असलेला न्युनगड बाजूला ठेवावा. तर, गावातील जिल्हापरिषद शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याच्या पालकांची पाणी किंवा घरपट्टी माफ करण्यासाठी आपणं प्रयत्न करणार असल्याची ग्वाही यावेळी उपसरपंच सुनील मुन्तोडे यांनी दिली.