अमृतवाहिनीच्या निडो स्कूलचे सात विद्यार्थी इस्रोला भेट देणार!
◻️ प्राचार्य अंजली कन्नावार यांची माहिती
संगमनेर LIVE | अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या अमृतवाहिनी निडो इंटरनॅशनल स्कूलच्या सात विद्यार्थ्याची डॉ. सी. व्ही. रमण बाल वैज्ञानिक परीक्षेत उत्कृष्ट यश मिळवून चमचमणारे तारे म्हणून निवड झाली आहे. सात विद्यार्थ्याना इस्रोमधील विशेष वैज्ञानिक कार्यशाळेत स्थान मिळवून त्यांनी इस्रोच्या दौऱ्यावर जाण्याची सुवर्णसंधी या बालवयात मिळाली आहे. अशी माहिती प्राचार्य अंजली कन्नावार यांनी दिली.
इस्रोमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्याच्या बाबत माहिती देताना प्राचार्य म्हणाल्या की, कु. रुद्र बोऱ्हाडे (इयत्ता ६ वी), कु. स्वरा अडांगळे (इयत्ता ७ वी), कु. सावित्री वाकचौरे (इयत्ता ७ वी), कु. मनीष कोहकडे (इयत्ता ७ वी), कु. अर्चित पवार (इयत्ता ७ वी), कु. वरद पाचोरे (इयत्ता ८ वी), कु. पृथ्वीराज नेहे (इयत्ता ९ वी) या सर्व विद्यार्थ्याची चमकणारे तारे म्हणून निवड झाली आहे.
अमृतवाहिनीचे निडो इंटरनॅशनल स्कूल गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबर विद्यार्थ्याच्या सर्वागीण व्यक्तिमत्व विकासासाठी नेहमीच कार्यरत असते. सातत्यपूर्ण शिक्षणाच्या आधारे सातही विद्यार्थ्यानी जिद्द, चिकाटी व परिश्रमाच्या आधारे बालवायत इस्रोला भेट देण्याची संधी मिळविली आहे.
दरम्यान या सर्व विद्यार्थ्यांचे माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, अमृतवाहिनी संस्थेच्या विश्वस्त सौ. शरयू देशमुख, निडो स्कूलच्या संचलिका सौ. अंजली कन्नावार यांनी विद्यार्थ्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल कौतुक करून इस्रोच्या भेटीसाठी अभिनंदन केले आहे.