संतोष रोहम यांच्याकडे दृष्टी नसली तरी, दृष्टिकोन आहे - सौ. शालिनीताई विखे
◻️ शेतकरी नेते संतोष रोहम यांचा गौरव सोहळा संपन्न
संगमनेर LIVE | शेतकऱ्यांच्या हितासाठी आपले सर्वस्व पणाला लावणारे शेतकरी नेते संतोष रोहोम यांच्याकडे दृष्टी नसली तरी, त्यांच्याकडे असलेल्या दृष्टीकोनाला समाजाने पाठींबा दिला आहे. मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या मदतीने जगण्याची उमेद मिळालेला एक सच्चा नेता हा या परीवर्तानचा शिलेदार असल्याचा गौरव जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे यांनी केला.
संगमनेर येथे आमदार अमोल खताळ मित्र मंडळाच्या वतीने शेतकरी नेते संतोष रोहम यांच्या जन्मदिनाच्या औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या गौरव सोहळ्यात सौ. विखे बोलत होत्या. जेष्ठ नेते दशरथ सावंत, सौ. नीलम खताळ, सौ. शारदा रोहम, बापुसाहेब गुळवे, वसंतराव गुंजाळ, सुदाम सानप, डॉ. अशोक इथापे, सौ. पायल ताजणे, श्रीकांत गोमासे, गुलाब भोसले, गोकुळ दिघे, राहुल दिघे, हरिश्चंद्र चकोर, वैभव लांडगे, विठ्ठलराव घोरपडे, रामभाऊ राहणे, दिनेश फटांगरे, विनोद सूर्यवंशी, जनार्दन आहेर, कैलास कासार, रौफ शेख, ऋतिक रोहन, राहुल रोहन, बंडूनाना देशमुख यांच्यासह तालुक्यातील महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
सौ. विखे पुढे म्हणाल्या की, संतोष हे नाव त्यांच्या व्यक्तिमत्वाला शोभेल असेचं आहे. त्यांनी केलेल्या संघर्षात खूप काही दडलेल असून आजोबांकडून मिळालेला विचारांचा आणि संघर्षाचा वारसा त्यांनी पुढे नेण्याचे काम केले. अन्याया विरोधात लढा देवून समाजातील लोकांना न्याय मिळवून देण्याचे काम सदैव त्यांनी केले, असे गौरवोद्गार सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी काढले.
दशरथ सावंत म्हणाले, परीवर्तानाच्या काळातील एक सच्चा नेता म्हणून संतोष रोहोम यांची नोंद झाली आहे. भगतसिंगासारखे धाडस त्यांनी दाखवले. डॉ आंबेडकर यांचे विचार फक्त नावासाठी जपणारे अनेकजण आहेत. मात्र, रोहोम यांनी त्या विचारावर वाटचाल करून राजकाराणात सकारात्मक पर्याय उभे करण्यासाठी केलेले प्रयत्न महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले.
आमदार अमोल खताळ म्हणाले की, संतोष रोहोम म्हणजे राजकीय, सामाजिक चळवळीत नेतृत्व करणारे व्यक्तिमत्व आहे. अनेक आंदोलनात त्यांच्या समवेत सहभागी झालो. त्यामुळे खूप काही शिकायला मिळाले. आलेल्या दिव्यांगावर मात करून त्यांनी मला विधानसभेच्या निवडणुकीत केलेले मार्गदर्शन मोलाचै ठरले. त्यांच्या संकल्पनेतील विकासाची प्रक्रीया तालुक्यामध्ये राबविताना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन उभारण्याचे काम पूर्ण केले जाईल. अतिशय संकाटाच्या काळात संतोष रोहोम यांची पत्नी आणि मुलांनी त्यांना दिलेला आधार कौतुकास्पद असल्याच्या भावना व्यक्त केल्या.
दरम्यान सत्काराला उतर देताना संतोष रोहोम म्हणाले की, कोव्हीड संकटात आलेल्या अंधत्वावर मात करण्यासाठी अनेक मित्रांनी आधार दिला. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या सहकार्यामुळे आज मी आपल्यात आहे. तालुक्यातील अनेक प्रश्नासाठी संघर्ष केला. यातून तयार झालेल्या वातावराणातून परीवर्तन झाले अन् आमचा चाळीस वर्षाचा वनवास संपल्याचे सांगितले.