सहकार महर्षी थोरात साखर कारखान्याच्या रोलरचे पूजन संपन्न

संगमनेर Live
0
सहकार महर्षी थोरात साखर कारखान्याच्या रोलरचे पूजन संपन्न 

◻️ ऊस उत्पादन वाढीसाठी ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर करणार - बाळासाहेब थोरात 

संगमनेर LIVE | ऊस आणि दूध हे शाश्वत पीक असून एकरी उत्पादन वाढीसाठी आगामी काळात नवीन ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर करणार आहोत. संगमनेर तालुका हे कुटुंब असून यश मिळवण्यासाठी कष्ट हे करावेच लागतात. परमेश्वराच्या आशीर्वादाने कारखान्याची व सहकाराची चांगली वाटचाल सुरू आहे. असे प्रतिपादन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२५-२६ या गळीत हंगामासाठी पहिल्या मिल रोलरचे पूजन करण्यात आले. यावेळी बाळासाहेब थोरात बोलत होते. 

व्हा. चेअरमन, पांडुरंग घुले, रणजीतसिंह देशमुख, संपतराव डोंगरे, सुधाकर जोशी, लक्ष्मणराव कुटे, संचालक संपतराव गोडगे, इंद्रजीत थोरात, डॉ. तुषार दिघे, विनोद हासे, रामदास धुळगंड, विलास शिंदे, रामनाथ कुटे, नवनाथ आरगडे, विजय राहणे, गुलाब देशमुख, अरुण वाकचौरे, योगेश भालेराव, अंकुश ताजने, दिलीप नागरे, सौ. लता बाबासाहेब गायकर, सौ. सुंदराबाई रावसाहेब डूबे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, सेक्रेटरी किरण कानवडे आदींसह विविध पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना माजी मंत्री  थोरात म्हणाले की, साखर कारखानदारीमध्ये प्रत्येक हंगाम हा आव्हानाचा आणि कष्टाचा असतो. व्यवस्थापन, अधिकारी, कर्मचारी हे सर्व कुटुंब असून सर्वानी ज्याचे त्याचे काम चांगले केल्याने यश मिळत असते. शरीराच्या अवयवाप्रमाणे कारखान्याचा प्रत्येक पार्ट महत्त्वाचा असून हाफ सीजन मध्ये सतर्क राहून प्रत्येक गोष्टीची काळजी घ्यावी लागते.

कारखाना कार्यक्षेत्रात ऊस उत्पादन वाढले पाहिजे. याकरता ऊस विकास मेळाव्यांचे आयोजन सुरू असून आगामी काळामध्ये एकरी उत्पादन वाढवण्यासाठी नवीन तंत्रज्ञान वापरणे आवश्यक आहे. याचबरोबर लागवड करताना टप्प्याटप्प्याने केली पाहिजे ८६०३२ हा ऊस नव्या तंत्रज्ञानानुसार अगदी १२ ते १३ महिन्यात काढण्यासाठी येऊ शकतो. कमी पाणी, कमी श्रम आणि जास्त उत्पादन हे तत्व अवलंबताना कार्यक्षेत्रामध्ये जास्तीत जास्त ऊस उत्पादन करण्यासाठी शेतकऱ्यांनी काम करावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी पांडुरंग घुले यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर म्हणाले की, यावर्षी कार्यक्षेत्रामध्ये कमी ऊस असल्याने आव्हान मोठे आहे. चांगला भाव देण्यासाठी कार्यक्षेत्रात जास्त ऊस उत्पादन होणे गरजेचे आहे. कारखान्याने ऊस उत्पादन वाढीकरता विविध अनुदान योजना सुरू केल्या असून सेंद्रिय खत सुद्धा उपलब्ध आहे. आगामी गाळपाच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने मशीनचे ओव्हर ऑइलिंगची सर्व कामे, ऊस तोडणी, वाहतूक, मजूर ही सर्व कामे योग्य वेळेत पूर्ण करू असे ते म्हणाले.

याप्रसंगी विष्णू ढोले, रामनाथ शिंदे, नामदेव शिंदे, बाबजी वामन, संभाजी वाकचौरे, शिवाजी जगताप, प्रा. बाबा खरात, अनिल सोमणी, अशोक मुटकुळे, नवनाथ गडाख भाऊसाहेब खर्डे, अशोक कवडे आदींसह सर्व विभाग प्रमुख कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी तर, व्हा. चेअरमन पांडुरंग घुले यांनी आभार मानले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !