डॉ. विखे पाटील आयटीआयमध्ये २०० तासांचे प्रशिक्षण व कॅम्पस मुलाखती

संगमनेर Live
0
डॉ. विखे पाटील आयटीआयमध्ये २०० तासांचे प्रशिक्षण व कॅम्पस मुलाखती

◻️ टीएनएस इंडिया फाउंडेशनच्या सहकार्याने विद्यार्थ्याना रोजगारक्षम बनवणारा प्रकल्प यशस्वी रित्या पूर्ण

संगमनेर LIVE (अहिल्यानगर) | टीएनएस इंडिया फाउंडेशन (टीएनएसआयएफ), मुंबई आणि डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या प्रायव्हेट औद्योगिक प्रशिक्षण संस्था, एमआयडीसी, अहिल्यानगर यांच्यात दिनांक ३ जानेवारी २०२५ रोजी स्वाक्षरी झालेल्या सामंजस्य करारानुसार (एमओयू) विद्यार्थ्याच्या कौशल्यविकास, रोजगार संधी आणि उद्योगसज्जतेसाठी "कॅम्पस टू इडस्ट्रीयल करीयर" हा विशेष उपक्रम राबवण्यात आला.

या उपक्रमाअंतर्गत संस्थेतील १०३ विद्यार्थ्यानी एकूण २०० तासांचे सखोल प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले. या प्रशिक्षणामध्ये वैयक्तिक, व्यावसायिक व पर्यावरणपूरक ग्रीन स्किल्स चा समावेश होता. सर्व विद्यार्थ्यांना प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. 

प्रशिक्षणामध्ये समाविष्ट घटक: योग्य करिअर निवडीसाठी मार्गदर्शन व आत्ममूल्यांकन, सीव्ही तयार करणे, अर्ज प्रक्रिया व मुलाखतीसाठी तयारी, सहकारी व ग्राहकांशी संवाद कौशल्ये, ईमेल शिष्टाचार

कार्यस्थळी वर्तन व नोकरीतील नैतिकताग्रीन स्किल्स प्रशिक्षण : इलेक्ट्रिक वाहन तंत्रज्ञान, इव्ही बॅटरी व इलेक्ट्रिक मोटर कार्यप्रणाली, सौर पीव्ही मॉड्यूल्स व त्यांची स्थापना, नूतनीकरणीय ऊर्जा, टिकाऊ विकास व पर्यावरण संरक्षण प्रशिक्षणानंतर दि. २० जून २०२५ रोजी, संस्थेमध्ये पुढील नामांकित कंपन्यांच्या कॅम्पस मुलाखती आयोजित करण्यात आल्या यूकेबी इलेक्ट्रॉनिक्स लि, रांजणगाव एमआयडीसी, बजाजा इलेक्ट्रीकल लि. महाळुंगे इंगळे, तळेगाव-चाकण रोड या मुलाखतींमधून एकूण ३९ विद्यार्थ्यांची थेट निवड करण्यात आली,ज्यामुळे विद्यार्थ्याना त्वरित रोजगाराच्यासंधी उपलब्ध झाल्या. 

या उपक्रमामुळे विद्यार्थ्याच्या आत्मविश्वासात लक्षणीय वाढ, संवाद कौशल्ये आणि व्यक्तिमत्त्व विकास, उद्योग क्षेत्रातील वास्तव समज, पर्यावरणपूरक विचारसरणी व आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख, यामुळे विद्यार्थी स्पर्धात्मक नोकरीच्या बाजारात अधिक आत्मविश्वासाने सहभागी होऊ लागले आहेत. 

कार्यक्रमाच्या यशाबद्दल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, डॉ. सुजय विखे पाटील, डॉ. पी. एम. गायकवाड, सुनील कोल्हापुरे, डॉ. अभिजीत दिवटे, प्राचार्य ए. व्ही. सूर्यवंशी, उपप्राचार्य काकडे, गटनिदेशक पठारे व भुसे, प्रशिक्षण व प्लेसमेंट अधिकारी अरुण म्हस्के, प्रणव गोडले संपूर्ण शिक्षक व आयटीआय टीमचे अभिनंदन केले.

दरम्यान हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी केवळ एक प्रशिक्षण प्रक्रिया नव्हे, तर कौशल्य, रोजगार आणि औद्योगिक सज्जतेचा व्यापक आराखडा ठरला आहे. उद्योगाभिमुख उपक्रम,आधुनिक तंत्रज्ञान. प्रशिक्षण,इंटरनशिप व प्लेसमेंट एकत्रित योजना या माध्यमातून इंडस्ट्री अकॅडमी इनटरफेस सशक्त करण्यासाठी सातत्याने कार्यरत राहणार आहे.हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून, शिक्षण आणि उद्योग यामधील दुवा अधिक बळकट करण्याच्या दिशेने एक ठोस पाऊल आहे.

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !