जोर्वे ग्रामस्थांचे संगमनेर पंचायत समितीला घेराव घालत आंदोलन!
◻️ जोर्वे ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचाराची एक महिन्यात चौकशी करा, अन्यथा आमरण उपोषण करण्याचा दिला इशारा
संगमनेर LIVE | मागील तीन वर्षापासून जोर्वे ग्रामपंचायतवर मंत्री विखे पाटील गटाची सत्ता आहे. मात्र, या कालावधीत अनागोंदी कारभार आणि मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. असा गंभीर आरोप उपसरपंचासह ग्रामस्थांनी केला आहे. याबाबत आज संगमनेर पंचायत समितीला घेराव घालत आंदोलन करण्यात आले. तर, पुढील एक महिन्यांमध्ये भ्रष्टाचाराची चौकशी न झाल्यास आंदोलकांनी आमरण उपोषणाचा इशारा देखील देण्यात आला.
तालुक्यातील जोर्वे ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत आज पंचायत समितीला घेराव घालत आक्रमक आंदोलन करण्यात आले.
यावेळी जोर्वेचे उपसरपंच बादशहा बोरकर, माणिक यादव, सुरेश थोरात, आण्णासाहेब थोरात, हौशीराम दिघे, किसन खैरे, दिगंबर इंगळे, संदीप काकड, मुकेश काकड, रावसाहेब दिघे, राजेंद्र थोरात, रावसाहेब नाना काकड, बाळासाहेब चव्हाण, जालिंदर जोर्वेकर, सागर यादव, राजू बलसाने, संजय थोरात, सुखदेव चव्हाण, पुंजाहरी दिघे, हरिभाऊ इंगळे, सोपान कोल्हे, गोरख काकड, संतोष जाधव, संपत थोरात, रावसाहेब लक्ष्मण काकड, शांताराम दिघे, जगन्नाथ दिघे, सुनिल दिघे, विठ्ठल काकड, राजू शेख, राहुल बोरकर, अनिल गायकवाड, रावसाहेब यादव, सागर भवर, भाऊसाहेब दिघे, प्रमोद इंगळे, डॉ. प्रवीण काकड, अक्षय दिघे, बंटी यादव, गणेश इंगळे, योगेश जोशी, वसंत बोरकर, संदीप काकड, संदीप इंगळे, अनिल थोरात, अमोल क्षिरसागर, भास्कर बर्डे, सत्यजित थोरात, सौ. मीनाक्षीताई थोरात, मनीषा दिघे, संगीता थोरात, मंगल काकड, जयश्री दिघे, मंगल दिघे, लता बर्डे, ज्योती थोरात, अनिता काकड आदि उपस्थित होते.
जोर्वे हे संगमनेर तालुक्यातील राजकीय दृष्ट्या अत्यंत संवेदनशील गाव आहे. येथील ग्रामपंचायतीवर मंत्री विखे पाटील यांच्या गटाची सत्ता आहे. मागील तीन वर्षाच्या कार्यकाळात ग्रामपंचायतमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. यामध्ये लाखो रुपयांचा वस्तू खरेदी घोटाळा, रस्त्यांचे मुरुमीकरण अनुदान, रस्त्यासह विविध कामात १९ लाखांचा अपहार झाल्याचा आरोप आंदोलन कर्त्यानी केला आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
भ्रष्टाचार व अनागोंदी कारभाराची तातडीने चौकशी करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली. मात्र, राजकीय दबावातून कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे पंचायत समितीवर येऊन आंदोलन करावे लागले. अशी भूमिका आंदोलकांनी स्पष्ट केली.
दरम्यान एक महिन्यांमध्ये या भ्रष्टाचाराची चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी. अन्यथा पंचायत समिती समोर आमरण उपोषण करु. असा इशारा उपस्थित आंदोलकांनी गटविकास अधिकारी आणि विस्तार अधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
कॉग्रेस - भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने..
जोर्वे ग्रामपंचायत भ्रष्टाचार प्रकरणांवरून गुरुवारी कॉग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने आल्यामुळे पंचायत समिती आवारात काही काळ तणाव निर्माण झाला होता. याप्रसंगी दोन्ही गटातील कार्यकर्त्यानी एकमेकांवर जोरदार टिका केली. तर, दोन्ही गटांनी या प्रकरणाची निःपक्ष चौकशी करण्याची मागणी देखील केली आहे. दरम्यान दोन्ही गटातील कार्यकर्त्याचा आक्रमकपणा पाहता भविष्यात म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता वाढली आहे.