निराधार दिव्यांग वृद्ध महिलेच्या मदतीसाठी डॉ. सुजय विखे पाटील आले धावून!
◻️ डॉ. विखे यांच्या सुचनेनतंर अवघ्या एका तासात वैद्यकीय तपासणी करून साधनांचे महिलेला वितरण
महिला अहिल्यानगर शहरातील सिद्धार्थनगर भागात राहत असल्याचे समजताच, त्यांनी तातडीने त्या परिसराचे नगरसेवक धनंजय जाधव यांच्याशी संपर्क साधून संबंधित वृद्ध महिलेचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. शोध घेतल्यानंतर सदर महिला तपोवन रस्त्यावर आढळून आल्या.
दरम्यान डॉ. सुजय विखे पाटील यांच्या सूचनेनुसार त्या महिलेस विळदघाट येथील डीडीआरसी सेंटरमध्ये तातडीने दाखल करण्यात आले. अवघ्या एका तासात त्यांची वैद्यकीय तपासणी करून आवश्यक सहाय्यक साधनांचे वितरण देखील करण्यात आले.
या तात्काळ मदतीमुळे केवळ त्या वृद्ध महिलेला आधार मिळालेला नाही, तर संपूर्ण समाजात एक सकारात्मक संदेश गेला आहे की लोकप्रतिनिधी जर संवेदनशील आणि कृतीशील असतील, तर कोणतीही यंत्रणा अपयशी ठरत नाही.
दरम्यान डॉ. सुजय विखे पाटील यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे एक निराधार महिलेला आधार मिळाला असून याबद्दल डॉ. सुजय विखेंनी समाधान व्यक्त केले आहे.