योजनांच्‍या अंमलबजावणीत जिल्‍हा राज्‍यात अग्रस्‍थानी - मंत्री विखे पाटील

संगमनेर Live
0

योजनांच्‍या अंमलबजावणीत जिल्‍हा राज्‍यात अग्रस्‍थानी - मंत्री विखे पाटील

◻️ मंत्री विखे पाटील आणि डॉ. सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत नगर येथे आजी माजी अधिकाऱ्यांचा स्नेहमेळावा 

संगमनेर LIVE (नगर) | लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील सर्व विभागांच्‍या आधिकाऱ्यांमध्‍ये चांगला समन्‍वय राहील्‍यामुळेच योजनांच्‍या अंमलबजावणीत अहिल्‍यानगर जिल्‍हा राज्‍यात अग्रस्‍थानी राहीला. भविष्‍यातही जिल्‍ह्याच्‍या विकास प्रक्रीयेचा वेग कायम राहण्‍यासाठी सुसंवादाने अधिक चांगले काम करण्‍याची अपेक्षा व्‍यक्‍त करतानाच मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या दिडशे दिवसांच्‍या कृती कार्यक्रमाच्‍या निमित्‍ताने जिल्‍ह्याच्‍या विकासाचे व्‍हीजन डॉक्‍युमेंट तयार करण्‍याचे आवाहन जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केले.

अहिल्‍यानगर जिल्‍ह्यामध्‍ये नव्‍याने रुजु झालेले तसेच बदलून गेलेल्‍या आधि‍काऱ्यांचा सन्‍मान सोहळा मंत्री विखे पाटील यांच्‍या प्रमुख उपस्थितीत संपन्‍न झाला. या निमित्‍ताने आयोजित केलेल्‍या स्‍नेह संवाद मेळाव्‍यात त्‍यांनी जिल्‍ह्यात विकास प्रक्रीयेची सुरु असलेली वाटचाल तसेच अगामी काळात जिल्‍ह्याच्या विकासाचे उद्दिष्ट पुर्ण करण्‍यासाठी कराव्‍या लागणाऱ्या निर्णयांची माहीती त्‍यांनी दिली. आमदार विठ्ठलराव लंघे, आमदार विक्रमसिंह पाचपुते, साखर आयुक्त सिध्दराम सालीमठ, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अतिरीक्त जिल्हाधिकरी बाळासाहेब कोळेकर, अतिरीक्त पोलीस अधिक्षक सोमनाथ वाकचौरे, आयुक्त यशवंत डांगे, शिर्डी साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ गाडीलकर यांच्यासह सर्व विभागांचे जिल्हा आणि क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना मंत्री विखे पाटील म्‍हणाले की, मागील अडीच वर्षात शासनाच्‍या अनेक सामाजिक उपक्रमांमधून सामान्‍य माणसाला विकासाच्‍या प्रक्रीयेत आणता आले. शासन आपल्‍या दारी उपक्रमातून सुमारे २५ लाख लाभार्थ्‍याना विविध शासकीय दाखले देता आले. लाडकी बहीण योजनेची सुमारे १३ लाख महिलांनी केलेली नोंदणी, घरकुल योजनेची यशस्‍वी अंमलबजावणी यांसह अन्‍य विभागांनीही त्‍यांच्या स्‍तरावर केलेल्‍या यशस्‍वी कामगिरीमुळे राज्‍यात अहिल्‍यानगर जिल्‍हा अग्रेसर राहीला. यासर्व प्रक्रीयेत प्रशासनातील आधिकाऱ्यांनी दिलेले योगदान खुप महत्‍वपूर्ण असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या उपस्थितीत निळवंडे धरणाचे लोकार्पण आणि शासन आपल्‍या दारी उपक्रमाच्‍या समारोप कार्यक्रमाची आठवण सांगताना मंत्री विखे पाटील म्‍हणाले की, त्‍याच दिवशी राज्‍यात आरक्षणाच्‍या मागणीवरुन आंदोलनं सुरु होती. या तणावाच्‍या परिस्थितीत कार्यक्रम कसा होणार असा प्रश्‍न सर्वांच्‍याच समोर होता. परंतू आधिकाऱ्यांचे सहकार्य आणि नागरीकांनी दाखविलेल्‍या  उपस्थितीमुळे हा ऐतिहासिक कार्यक्रम होवू शकला.

मागील कालखंडात झालेले सर्वच कार्यक्रम हे जिल्‍ह्याच्‍या विकास प्रक्रीयेला पुढे घेवून जाण्‍यासाठी उपयुक्‍त ठरले. भविष्‍यातही आपल्‍याला चांगल्‍या सुसंवादातून अनेक चांगली कामे करायची आहेत. जिल्‍ह्यात तिर्थक्षेत्र, औद्योगिक क्षेत्र आणि क्रिडा क्षेत्राच्‍या अनुशंगाने अधिक काम करण्‍याची संधी आहे. माध्‍यमिक शाळांमधून विद्यार्थ्‍यांच्‍या गुणवत्‍तापुर्ण शिक्षणासाठी काही उपाय करावे लागतील. कौशल्‍य विकासातून रोजगाराची निर्मिती निर्माण करण्‍यासाठी प्रत्‍येक विभागाचे व्‍हीजन डॉक्‍युमेंट तयार करुन त्‍यावर काम करण्‍याचे आवाहन पालकमंत्री विखे पाटील यानी केले

डॉ. सुजय विखे पाटील यांनी आपल्या भाषणात अहिल्यानगर जिल्ह्यात विकासप्रक्रीया चांगल्या पध्दतीने राबवली गेल्यामुळे महायुतीला जनतेचे पाठबळ मिळाले. अधिकारी आणि कर्मचारी यांच्याशी चांगला संवाद ठेवला काम वेगाने पूर्ण होतात. इतरांसारखे आवाज चढवून बोलून काम होत नसल्याचा सूचक उल्लेख केला.

याप्रसंगी जिल्‍हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी सध्‍या जिल्‍ह्यात प्रशासनाकडून सुरु असलेल्‍या विकास कामांबाबत माहीती दिली. साखर आयुक्‍त सिध्‍दराम सालीमठ यांनी मंत्री विखे पाटील यांच्‍या प्रशासनाशी असलेल्‍या सुसंवादाचे कौतूक करुन, या जिल्‍ह्यामध्‍ये विकासाच्‍या खुप संधी आहेत. विकासाचा विचार करुन, काम करणारे नेतृत्‍व आहे. माझ्या ३२ वर्षाच्या प्रशासकीय सेवेत अनेक जिल्ह्यात काम केले पण असा अधिकारी वर्गाचा सन्मान प्रथमच अनुभवता आला. जिल्ह्यात चांगले काम करण्याची संधी आहे.यामध्ये योगदान देण्‍याचे त्‍यांनी आवाहन केले. विखे पाटील परिवाराच्‍या वतीने सर्व आधिकाऱ्यांचा सन्‍मान करण्‍यात आला.

अनेकदा योजनांची माहिती लोकप्रतिनीधीपर्यत पोहचत नाही. अधिकारी आपल्या कक्षेच्या बाहेर जावून काही निर्णय करताता आशावेळी मतमतांतरे निर्माण होतात. ही परीस्थीती उद्भवू नये यासाठी स्थानिक पातळीवर लोकप्रतिनीधीना विश्वासात घेवून निर्णय करण्याचे मंत्री विखे पाटील यांनी सूचित केले.

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !