जनतेच्या सर्वागीण विकासासाठी कटीबद्ध - आमदार अमोल खताळ

संगमनेर Live
0
जनतेच्या सर्वागीण विकासासाठी कटीबद्ध - आमदार अमोल खताळ

◻️ नांदुरी दुमालाला येथे ६० लाख रुपये किंमतीच्या विविध विकास कामांचा शुभारंभ 

संगमनेर LIVE | महायुती सरकारच्या माध्यमातून आपण तालुक्यातील सर्व गावांमध्ये विकासकामे करणार आहोत.‌ सर्व रस्त्यांचे कॉंक्रिटी करण करण्यात येणार असून ठेकेदारांची मर्जी न राखता कामाच्या दर्जाकडे लक्ष दिले जाणार आहे. तालुक्यातील सर्वच गावांचा सर्वागीण विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध कटीबद्ध आहोत. असा विश्वास  आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला.

संगमनेर तालुक्यातील नांदुरी दुमाला येथे जिल्हा नियोजनमधून पालकमंत्री विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या नांदुरी दुमाला ते ठाकरवाडी रस्ता मजबुतीकरण करणे २ लाख रुपये आणि जनसुविधा विशेष अनुदान योजनेमधून नांदुरी दुमाला येथे गावअंतर्गत रस्ताकरणे १० लाख रुपये, तसेच ग्रामपंचायत १५ वित्त आयोगातून जिल्हा परिषद शाळा भिंत बांधकाम करणे ३ लाख १८ हजार, नांदूरी दुमाला येथे कचरा विलगीकरण शेड बांधणे २ लाख रुपये, महालक्ष्मीमंदिर परिसरात शौचालय मुतारी बांधणे ३ लाख रुपये, नांदुरी दुमाला येथे भूमिगत गटार बांधणे ३ लाख रुपये, रस्ता मजबुतीकरण करणे तसेच हनुमान माळा रस्ता मजबुतीकरण करणे २ लाख रुपये आणि शिवरस्ता मजबुती करण करणे दीड लाख रुपये असा एकूण ६० लाख रुपयांचे विविध विकास कामांचा शुभारंभ आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी जेष्ठ कार्यकर्त्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार खताळ पुढे म्हणाले की, गेल्या चाळीस वर्षांपासून या तालुक्यात काहीनी केवळ स्वतःच्या तुंबड्या भरण्याचं काम केले आहे. त्यांनी गोरगरीब जनतेच्या जीवावर अन्यायकारक प्रथा रुजवल्या. पण आता हे सगळं बंद होणार आहे. विजेचे रोहित्र नवीन घेण्यासाठी कोणालाही एक रुपया ही देऊ नका. जर, कोणी मागत असेल तर मला सांगा. त्यांनी पैसे घेण्याची वाईट प्रथा पाडून ज्या खुट्ट्या ठोकल्या आहेत, त्या खुट्ट्या काढण्यासाठी थोडा वेळ लागेल. परंतु त्या शंभर टक्के काढल्या शिवाय आपण राहणार नाही, असा विश्वास व्यक्त केला.

तालुक्यातील कार्यकर्ते हे माझे कुटुंब आहे त्यांच्याकडे कोणी वाकड्या नजरेने पाहिलं, तर गाठ माझ्याशी आहे हे लक्षात ठेवावे. असा इशारा देत ते म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे त्रिदेव आपल्या मागे उभे भक्कमपणे आहेत. 

पालकमंत्री विखे यांनी तर माझे पालकत्व घेतले आहे, त्यामुळे विकास निधी आणण्यासाठी कुठली ही अडचण येणार नाही. त्यामुळे तुमच्या गावासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. गावात काही लोक पुढारी होतील मात्र त्यांच्याशी अजिबात स्पर्धा करू नका. त्यांनी जे केलं त्याचा आदर ठेवा, कोण काय बोलतो त्याकडे लक्ष देऊ नका. ते तुमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करतील. परंतु त्याकडे दुर्लक्ष करून आपले काम प्रमाणिकपणे करत रहा. असा सल्लाही आमदार खताळ यांनी कार्यकर्त्याना दिला.

प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचा लवकरच शुभारंभ..

प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची इमारत बांधून पूर्ण झाली आहे. मात्र ते अद्याप सुरू झालं नाही. माजी सरपंच मीनानाथ शेळके यांनी हा मुद्दा आपल्या निदर्शनास आणून दिला आहे. त्यावर आरोग्य मंत्री प्रकाश आंबिटकर आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समवेत मुंबईत बैठक घेतली. लवकरच कर्मचारी भरती करून हे आरोग्य उपकेंद्र सुरू केलं जाईल आणि त्याचा शुभारंभ देखील पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते केला जाईल, असेही आमदार खताळ यांनी सांगितले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !