एक आरोग्य शिबीर, ३० दिवस, १४ जिल्हे आणि ३० हजार समाधानी रुग्ण
◻️ एसएमबीटीच्या आरोग्यसाधनेची यशस्वी दहा वर्षे; दररोज सरासरी १ हजार रुग्णांची तपासणी
◻️ योजनेत न बसणाऱ्या आजारांवर मोफत उपचार उपलब्ध
संगमनेर LIVE (नाशिक) | एसएमबीटी हॉस्पिटल आयोजित यावर्षाचे आरोग्यसाधना शिबीर नुकतेच सुरु झाले आहे. या शिबिरातील सोयीसुविधा आणि रुग्णसेवेच्या दृष्टीने आखण्यात आलेल्या योजनेचे सर्वदूर कौतुक होत असून समाजसेवेचा एक नवा आयाम यानिमित्ताने गाठण्यात यश आले आहे. गेल्या ३० दिवसांत, उत्तर महाराष्ट्रसह मराठवाड्यातील १४ जिल्ह्यांतील ३० हजाराहून अधिक रुग्णांवर उपचार करण्यात हॉस्पिटलच्या टीमला यश आले आहे. ही केवळ आकड्यांची गोष्ट नसून, हजारो जीवांच्या आयुष्यातील नव्या आशेच्या किरणांचे प्रतिक असल्याचे हॉस्पिटल प्रशासनाकडून सांगण्यात आले.
आरोग्यसाधना शिबिराच्या यशस्वीतेबाबत हॉस्पिटल प्रशासनाने सांगितले की, हे शिबीर केवळ मोफत तपासणी नव्हे, तर हजारो गरजूंसाठी सशक्त उपचार, तज्ज्ञ मार्गदर्शन आणि मायेचा आधार ठरत आहे. आर्थिक दुर्बल घटकातील सर्वसामान्य रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांपर्यंत पोहोचणे शक्य नसते. शस्त्रक्रीया किंवा औषधोपचाराचा खर्च अलीकडे सर्वांच्याच आवाक्याबाहेर जात आहे. याचा गंभीर परिणाम रुग्णांवर होत असून आजही अनेक खेडोपाड्यात दुर्धर आजारांनी अनेक रुग्ण ग्रासलेले दिसून येत आहेत.
रुग्णांचा विश्वास आणि माणुसकीच्या आधारावर उभ्या राहिलेल्या एसएमबीटी हॉस्पिटलतर्फे ग्रामीण आरोग्य सुधारण्यासाठी गेल्या दहा वर्षांपासून आरोग्यसाधना शिबिराचे आयोजन केले जात आहे. गेल्या ३० दिवसांत शिबिरादरम्यान १ हजाराहून अधिक मोठ्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत. यामध्ये दोनशे पेक्षा अधिक हृदयविकार शस्रक्रियांचा समावेश आहे. १५०० डायालिसिस सत्रदेखील झाले आहेत. विशेष म्हणजे सवलतीत अत्याधुनिक सोनोग्राफी - एमआरआय तपासण्या, सिटी स्कॅन करण्यासाठी अनेक भागातील रुग्णांनी याठिकाणी भेटी देऊन उपचार करून घेतले.
विशेष म्हणजे या सर्व सेवा शासकीय योजनांच्या माध्यमातून मोफत उपलब्ध आहेत. यामध्ये महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना (MJPJAY), प्रधानमंत्री जनआरोग्य योजना (PMJAY), राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK) अंतर्गत मोफत उपचार केले जात असल्याची माहिती हॉस्पिटलच्या वतीने देण्यात आली. तसेच जे आजार योजनेअंतर्गत उपचारांत बसत नाहीत अशा आजारांवर हॉस्पिटलच्या वतीने हॉस्पिटल चार्जेस, बेड चार्जेस, भूलतज्ञ चार्जेस, नर्सिंग चार्जेस, ऑपरेशन चार्जेस व जेवण पूर्णपणे मोफत दिले जात आहेत. या योजनेत रुग्णांना केवळ अत्यल्प दरातील औषधे, रेडीओलॉजी आणि पथोलॉजी चाचण्यांच्या खर्चात उपचार उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या यशस्वी शिबिरानंतर एसएमबीटी हॉस्पिटल आगामी काळात इतर तालुक्यांमध्ये उपशाखा, मोफत तपासणी केंद्रे आणि योजनांचे जनजागरण मोहीम राबवणार आहे, जेणेकरून अधिकाधिक गरजू रुग्णांपर्यंत ही सेवा पोहोचवता येईल.
१४ जिल्हे, हजारो किलोमीटरचा प्रवास, आणि सेवा प्रत्येकाच्या दारी..
या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्राच्या १४ जिल्ह्यांमधून रुग्ण एसएमबीटीपर्यंत आले. नाशिक, अहिल्यानगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, ठाणे, पालघर, बीड, परभणी, छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव, वर्धा, अमरावती, नागपूर यांसारख्या भागांतून आलेल्या रुग्णांनी एसएमबीटीच्या रुग्णसेवेवर विश्वास ठेवला. एसएमबीटीने रुग्ण, वाहने, रहदारी, सुलभ सेवा आणि स्वयंसेवकांच्या सहाय्याने प्रत्येक टप्प्यावर रुग्णांना मार्गदर्शन केले आहे.
योजनेत न बसणाऱ्या आजारांवर उपचार उपलब्ध..
या वर्षीच्या आरोग्यसाधना शिबिरात योजनेत न बसणाऱ्या रुग्णांना मोफत स्पेशालिटी आणि सुपरस्पेशालिटी डॉक्टरांचे मार्गदर्शन, हॉस्पिटल चार्जेस, नर्सिंग चार्जेस, बेड चार्जेस, शस्रक्रिया चार्जेस, भूलतज्ञ चार्जेस आणि जेवण मोफत करण्यात आले आहेत. रुग्णांना केवळ सवलतीच्या दरात असलेली औषधे, रेडीऑलॉजी आणि पॅथोलॉजी चाचण्यांच्या खर्चात उपचार उपलब्ध करण्यात आल्यामुळे मोठ्या प्रमाणात रुग्ण या योजनेच्या लाभासाठी पहिल्या दिवसापासूनच रुग्णालयात पोहोचत आहेत.
२५ पेक्षा अधिक सेवा एकाच छताखाली..
एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये एकाच छताखाली २५ वेगवेगळया विभागांच्या स्पेशालिटी आणि सुपर स्पेशालिटी सेवा देणारे ग्रामीण भागातील एसएमबीटी एकमेव हॉस्पिटल आहे. हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान, तज्ज्ञ डॉक्टर आणि सेवाभाव यांचा संगम असल्यामुळे हृदयविकार, कर्करोग, किडनी विकार, मेंदू-मणक्याचे विकार, पोटविकार, मूत्ररोग, स्त्रीरोग कान - नाक - घसा, अस्थिरोग अशा २५ पेक्षा अधिक मल्टीस्पेशालिटीमध्ये सेवा उपलब्ध आहेत. वरील प्रत्येक विभागात तज्ज्ञ आणि अनुभवी डॉक्टर्स पूर्णवेळ उपलब्ध आहेत.