बस अपघातात जखमी विद्यार्थ्याना मदतीच्या माजी मंत्री थोरात यांच्या सूचना
◻️ इंद्रजीत थोरात यांनी चंदनापुरी घाट अपघातातील जखमी विद्यार्थ्याची केली चौकशी
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील चंदनेश्वर विद्यालयाची स्कूल बस विद्यार्थ्याना घेऊन येत असताना घाटामध्ये सुरू असलेल्या एकेरी वाहतुकीमुळे ही स्कूलबस साईड गटारामध्ये पलटली. त्यामुळे चार-पाच विद्यार्थ्यानी जखमी झाले. ही बातमी कळताच माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या यंत्रणा व कार्यकर्त्याना तातडीने मदतीच्या सूचना दिल्या असून इंद्रजीत थोरात यांनी रुग्णालयात जाऊन विद्यार्थ्याची चौकशी केली.
चंदनापुरी घाटातील रुग्णालयात या विद्यार्थ्यानवर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर तात्काळ थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात, विजय राहणे, इंद्रजीत खेमनर, सरपंच भाऊराव रहाणे, बाळासाहेब सागर, किरण राहणे, बालमशेठ सरोदे, आनंदराव कडणे, बाळू सरोदे, संदीप सरोदे, दिनकर भालेराव यांसह चंदनापुरी मधील कार्यकर्त्यानी रूग्णालयात धाव घेतली. यावेळी पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांसह मुख्याध्यापक उपस्थित होते.
दरम्यान शुक्रवारी सकाळी चंदनापुरी घाटामध्ये सुरू असलेल्या कॉंक्रिटीकरणाच्या कामामुळे एकेरी वाहतूक करण्यात आली आहे. समोरून येणाऱ्या वाहनाने हुल दिल्याने ही स्कूल बस साईड गटारामध्ये गेली. यामुळे चार - पाच विद्यार्थ्यी जखमी झाले. मात्र, दैव बलवत्तर म्हणून मोठा दुर्घटना टळली आहे.
दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपले सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना तातडीने या विद्यार्थ्याना मदत करण्याच्या सूचना दिल्या. यशोधन कार्यालयाचे प्रमुख तथा थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात, विजय राहणे यांनी तातडीने घटनास्थळी आणि रुग्णालयात जाऊन जखमी विद्यार्थ्याची चौकशी करत उपचाराबाबत माहिती जाणून घेतली.