आढळा धरण भरले ; लाभक्षेत्रात आनंद!

संगमनेर Live
0
आढळा धरण भरले ; लाभक्षेत्रात आनंद!

उपविभागीय जल अभियंता योगेश जोर्वेकर यांची माहिती 

संगमनेर LIVE (अकोले) | अकोले तालुक्यातील देवठाण येथील १०६० दशलक्ष घनफूट क्षमतेचे आढळा धरण आज गुरुवारी दुपारी १२ वाजता पूर्ण क्षमतेने भरले असल्याचे जलसंपदा विभागाने जाहीर केले आहे. त्यामुळे लाभक्षेत्रात आनंदाचे वातावरण असून सध्या ६० क्यूसकने नदीपात्रात विसर्ग सुरू आहे.

आढळा हे धरण चालू वर्षी जुलै च्या पहिल्याआठवड्यात भरत असल्याने शेतकरी बांधवांमध्ये आनंदाने वातावरण आहे. यामुळे रब्बी पिके आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाली आहे.

अकोले तालुक्यातील देवठाण वीरगाव, हिवरगाव आंबरे, डोंगरगाव, पिंपळगाव निपाणी व गणोरे तसेच संगमनेर तालुक्यातील धांदरफळ, जवळे कडलग, पिंपळगाव कोंझिरा, वडगाव लांडगा, चिकणी, राजापूर, निमगाव भोजापूर व चिखली ही आठ गावे व सिन्नर तालुक्यातील चास, नळवाडी व कासारवाडी दोन गावे अशा या १६ गावांना शेतीसाठी याच आढळा धरणातून पाणी मिळते. 

याशिवाय पाच गाव पाणीपुरवठा योजना असून या गावांना पिण्यासाठीही या धरणातून पाणी दिले जाते. त्यामुळे आढळा धरण भरणे परिसराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे व गरजेचे आहे. लाटांनी सांडव्याच्या बाहेर पाणी पडत असल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण पसरले आहे. लवकरच शासकीय जलपूजनाचा कार्यक्रम होणार आहे. अशी माहिती अकोले उपविभागीय जल अभियंता योगेश जोर्वेकर यांनी दिली.

दरवर्षी भंडारदरा व निळवंडे धरण भरल्यानंतर आढळा धरण भरण्यासाठी मोठी प्रतीक्षा करावी लागत असे. परंतु यावर्षी आढळा धरण अगोदर भरत असल्याने परिसरात समाधानाचे वातावरण आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !