आमदार खताळ यांच्या पाठपुराव्यातुन तीन महिन्यात १० एसटी बस
◻️ संगमनेर तालुक्यासाठी नव्याने दाखल झालेल्या बसचे उत्साहात लोकार्पण
संगमनेर LIVE | राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्यातून संगमनेर आगारात तीन ते साडेतीन महिन्यापूर्वी पाच एसटी बसेस दाखल झाल्या होत्या. आज शनिवारी आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला पुन्हा ५ एसटी बसेस दाखल झालेल्या आहेत.
शनिवारी सकाळी या पाच ही बसचे आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात लोकार्पण करण्यात आले. तर, संगमनेर आगारात मागील सहा महिन्यात १० नवीन एसटी बसेस दाखल झाल्यामुळे प्रवाशांनी आनंद व्यक्त केला आहे.
नवीन एसटी बस मिळवून दिल्याबद्दल आगार व्यवस्थापक प्रशांत गुंड यांनी आमदार खताळ यांचे यावेळी आभार मानले. याप्रसंगी शिवसेनेसह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महामंडळाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संगमनेर आगारातील एसटी कर्मचारी, चालक आणि वाहक यांच्या समस्या या शासनदरबारी मांडून सोडविल्या जातील. बस आणि बस स्थानक हे आपले आहे. असे मानून या प्रवाशांनी आणि नागरिकांनी स्वच्छ राखावी. असे आवाहन आमदार अमोल खताळ यांनी नागरीकाशी संवाद साधताना केले आहे.