शिवसेनेच्या आभार मेळव्याकडे तालुक्यातील जनतेची पाठ - अमर कतारी
◻️ खरे शिवसैनिक आणि भाजपचे पदाधिकारी मेळाव्याकडे फिरकले नसल्याचां केला दावा
संगमनेर LIVE | मोठा गाजावाजा करून इव्हेंटबाजी करण्याच्या नादामध्ये मूळ प्रश्नांना बगल देत संगमनेरची संस्कृती बिघडवणाऱ्या तथाकथित शिंदे सेनेने अत्यंत बटबटीत केला असून संगमनेर कराना हे कधीही मान्य नाही. या आभार मोर्चामध्ये पैसे देऊन लोक आणावे लागले ही मोठी शोकांतिका ठरली आहे. संगमनेर तालुक्यातील जनतेने या मेळाव्याकडे पाठ फिरवले असल्याचे बोचरी टिका शिवसेनेचे (उबाठा) माजी शहरप्रमुख अमर कातारी यांनी केली.
मेळाव्या बाबत बोलताना कतारी म्हणाले की, या भाषणांमध्ये कुठेही मुद्देसूतपणा नव्हता. जनतेला भाषण कळत नव्हते. तेच - तेच भाषण ऐकून लोक कंटाळले आहे. ज्यांनी गद्दारी केली तेच आता विकासाच्या गप्पा करत आहेत. कोरोना संकटाच्या काळात महाविकास आघाडी सरकारमध्ये हे प्रमुख मंत्री होते. त्यांचे पूर्ण भाषण जनतेला माहिती होते. तर विद्यमान आमदार हे फक्त द्वेश्या पोटी बोलत होते. संगमनेरचा जो विकास झाला आहे, तो मागील ४० वर्षात माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला. हे कोणीही नाकारू शकत नाही. मात्र, या स्टेजवरून व्यक्ति दोषाने महिला बोलत होत्या. तर, नवीन लोकप्रतिनिधी अत्यंत अपुऱ्या माहितीने आणि गोंधळलेल्या स्थितीमध्ये बोलत होते.
संगमनेर शहराला माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली निळवंडे धरणातून थेट पाईपलाईन योजनेद्वारे पाणी मिळाले आहे. शहरात विकासाच्या योजना सुरू आहेत. शांत व संयमी संगमनेर शहर ही ओळख निर्माण झाली आहे. मात्र, मागील आठ महिन्यापासून येथे दहशत वाढली असून याला जबाबदार कोण तर विद्यमान महायुती चे सत्ताधारी आहे.
व्यक्तिगत टीकाटिप्पणी मधून काहीही साध्य होत नसून समोर आलेली जनता ही संगमनेर तालुक्यातील नव्हती तर अंगणवाडी सेविका, अशा सेविका, बचत गटांच्या महिला यांना उपस्थित राहण्याचे फर्मान काढण्यात आले होते. या अत्यंत चुकीचे होते. याबाबत महिलांनी आपल्या भावनाही व्यक्त केल्या.
ज्या विखे परिवाराच्या पाठिंब्याने संगमनेरचे नवीन लोकप्रतिनिधी निवडून आले त्यांनी त्यांच्याबद्दल कृतज्ञता दाखवणे ऐवजी आता स्वतःचा अजेंडा सुरू केला आहे. मूळ शिवसैनिक आणि मूळ भाजपाचे लोक बाजूला सारले गेले आहेत. ज्यांचे समाजकारणात आणि पक्षाच्या उभारणीत कोणतेही योगदान नाही अशी लोक आता स्टेजवर मिरवत आहे.
रॅलीसाठी आलेले तरुण हे सर्व पैसे घेऊन भरकटवण्याचे काम काही मंडळी करत आहे. म्हणजे महायुतीचा हा देखावा करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यामधून काहीही साध्य झाले नसून बोलाची कढी बोलाचा भाग अशा प्रकारात काही कार्यकर्त्यांना पैशासाठी मारही खावा लागला ही सत्यता असल्याचे त्यांनी सांगितले.
तरुणांवर लाठीचार्ज..
गोंधळाची परिस्थिती झाल्याने जमलेल्या तरुणांवर लाठी चार्ज करण्यात आला. यामुळे काहीशी तणावपूर्ण परिस्थिती झाली. याचबरोबर नागरिकांनी चालू सभेतील काढता पाय घेतल्याने भाषणे घाईघाई करण्यात आली, अशी बोचरी टीका अमर कतारी यांनी केली.