संगमनेरातील शांती मोर्चाने खोट्या हिंदुत्वाचा बुरखा टराटरा फाडला
◻️ धर्म आणि जातीच्या नावाखाली तालुक्यात तेढ निर्माण करण्याचे षडयंत्र
संगमनेर LIVE | सध्या महाराष्ट्रासह देशांमध्ये जाती धर्माच्या नावावर राजकारण सुरू असून महाराष्ट्रातील संत व समाजसुधारकांची परंपरा घेऊन काम करणाऱ्या संगमनेर तालुक्यातील एकवटून राज्यभरात सुरू असलेल्या खोट्या हिंदुत्वाचा बुरखा टराटरा फाडला आहे.
साहित्य, शिक्षण, समाजकारण, राजकारण, सेवा अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी धर्माच्या पिठावरून राजकारण करणाऱ्या तथाकथित व्यक्तीचा निषेध केला असून राज्याचे सुसंस्कृत नेतृत्व बाळासाहेब थोरात यांना पाठिंबा दर्शवला आहे. याचबरोबर संगमनेर तालुक्यामधील नागरिकांनी तालुक्यात निर्माण झालेली दहशत व अशांतते विरुद्ध नाराजी व्यक्त केली असून टोळी गॅंगचा पर्दाफाश केला आहे.
संगमनेर मध्ये तमाम संगमनेरकरांनी एकत्र येऊन आपली सुसंस्कृत राजकारणाची पद्धत जपत खोट्या हिंदुत्वाचा चेहरा फाडला. स्वयंस्फूर्तीने या शांती मोर्चामध्ये महिला युवक वृद्ध आणि नागरीक हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते. शांत संयमी नेते म्हणून राज्याला परिचित असलेले बाळासाहेब थोरात या मोर्चात चांगलेच आक्रमक झाले. आपण स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा असून विचार व तत्वांसाठी बलिदान द्यायला तयार आहे असे सांगताना त्यांनी तथाकथित कीर्तनकाराच्या षड्यंत्राचा “लाव रे तो व्हिडिओ”द्वारे परदा फाश केला. याचबरोबर तालुक्यात गुंडगिरी आणि दहशत सहन करणार नाही असा इशारा त्यांनी दिला.
आमदार सत्यजित तांबे यांनीही आक्रमक पवित्रा घेत मोजक्या लोकांना हाताशी धरून जातीभेदाच्या नावाखाली तालुक्याची संस्कृती मोडू पाहणाऱ्यांना गर्भित इशारा दिला.
डॉ. जयश्रीताई थोरात यांनी अत्यंत आक्रमकपणे सत्ताधाऱ्यांकडून तरुणांवर हाफ मर्डर पर्यंत कशा केसेस लावल्या जातात असे सांगताना सर्व जाती धर्माचे लोक एकत्र नांदत असताना खोट्या हिंदुत्वाच्या नावाखाली भेद करणाऱ्या काही शक्ती विरोधात जोरदार हल्ला केला.
या मोर्चानंतर संगमनेर तालुक्यातील गावागावांमध्ये या जातीभेद निर्माण करणाऱ्या टोळी विरोधात मोठी लाट निर्माण झाली असून संगमनेर शहरातही अशांतता निर्माण करणाऱ्या विशिष्ट लोकांच्या विरुद्ध मोठा संताप निर्माण झाला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून विष पेरणाऱ्या व्यक्तींना आता जनता थारा देणार नाही अशी भावना महाविद्यालयीन युवती सायली पंडित व सुहानी राठी यांनी व्यक्त केली आहे. तर लोकनेते बाळासाहेब थोरात यांचे बालपण संत सावलीत गेले आहे. थोरात घराण्याला मोठी वारकरी संप्रदायाची परंपरा असून ती खरी हिंदुत्वाचे आणि वारकरी संप्रदायाचे पाईक असल्याची भावना तळेगाव भागातील ज्येष्ठ कीर्तनकार गणपत महाराज जोर्वेकर यांनी व्यक्त केली आहे.
हिंदुत्व हे बेगडी नसावे हिंदू धर्म आणि वारकरी संप्रदायाची शिकवण सर्वांना सोबत घेऊन जाण्याची आहे. मात्र तथाकथित महाराज हा सर्वधर्मसमभाव हा खोटा शब्द असल्याचे सांगून राज्यघटनेचा अपमान करत आहे असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. खोट्या हिंदुत्वाचा आसरा घेऊन भेद करणाऱ्या या प्रवृत्ती विरोधात महाराष्ट्रात मोठी लाट निर्माण झाली असून विविध साहित्यिक,पत्रकार,समालोचक विश्लेषक, राजकीय नेते, सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते यांनी मात्र या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. दिवसभर सोशल मीडिया त्याचप्रमाणे विविध युटुब चैनल, विश्लेषक यांनी या घटनेचे चांगले विश्लेषण केले असून खोट्या हिंदुत्व पसरवणाऱ्यांना मोठी चपराक दिली आहे. विश्वंभर चौधरी म्हणाले की, हिंदुत्व हे सर्वांना पुढे घेऊन जाणारे आहे मात्र काही लोक चुकीचा अर्थ काढून द्वेष निर्माण करत आहे याला चपराक देण्याचे काम संगमनेर तालुक्याने केले आहे.
संगमनेरच्या शांती मोर्चाची राज्यभरात दखल घेतली गेली असून सोशल मीडियातूनही तरुणाईचा मोठा पाठिंबा या मोर्चाला मिळाला आहे तर तालुक्यामध्ये दहशत निर्माण करणाऱ्या टोळीगँगचा पर्दाफाश झाल्याची प्रतिक्रिया तरुणांनी दिली आहे.
व्यापाऱ्यांकडूनही तीव्र निषेध..
संगमनेर हे शांततेचे व सुबत्त्याचे प्रतिक असलेले शहर आहे मात्र मागील आठ महिन्यांपासून संगमनेर शहरात सातत्याने जातीय तेढ निर्माण झाला असून याचा परिणाम समृद्ध बाजारपेठेवर झाला आहे. सध्या संगमनेर तालुक्यात सुरू असलेले राजकारण हे अत्यंत दुर्दैवी असून ४० वर्षाची चांगली परंपरा खंडित करण्याचे काम केले जात असल्याची टीका राणी प्रसाद मुंदडा यांनी केली आहे.
जातीभेदाच्या नावावर तरुणांना फसविले..
संगमनेर तालुक्यातील अनेक तरुण जातीभेदाच्या नावाखाली वेगळ्या वाटेवर गेले होते. मात्र तालुका हा हिंदू धर्मीयांचा आहे. येथील नेतृत्व हिंदू आहे. धर्माच्या नावावर तरुणांना खेळवले जात असून एक जीबी दोन जीबी डेटा च्या नावावर दिवसभर सोशल मीडियात अडकून ठेवून बेरोजगार तरुणांना त्यांच्या बेरोजगाराची जाणीव होऊ दिली जात नाही. यामुळे तरुणांचे करिअर बरबाद होत असून संगमनेरची संस्कृती टिकवण्याची जबाबदारी ही तरुणांची असल्याने घरातील वाढ वडिलांनी सगळ्यांना तालुक्याची परंपरा सांगितल्याने अनेक तरुणांनी जातीय राजकारणाला तीलांजली दिली असल्याची भावना वेल्हाळे येथील तन्मय सोनवणे व रोशन गुंजाळ यांनी व्यक्त केली आहे.