एसएमबीटीच्या ७२ विद्यार्थ्याना शिक्षण पूर्ण होण्याआधीचं ‘नोकरी’

संगमनेर Live
0
एसएमबीटीच्या ७२ विद्यार्थ्याना शिक्षण पूर्ण होण्याआधीचं ‘नोकरी’


◻️ ग्रामीण भागातील विद्यार्थी जागतिक कंपन्यांत नेतृत्वगुणाचा ठसा उमटवणार



संगमनेर LIVE (नाशिक) | एसएमबीटी महाविद्यालयाच्या फार्मसी व डिप्लोमाच्या तब्बल ७२ विद्यार्थ्याची बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड झाली आहे. विशेष म्हणजे, शिक्षण पूर्ण होण्याआधीच अनेक विद्यार्थ्याच्या हातात नोकरी असून अडीच लाख रुपये ते दहा लाख रुपये प्रतिवर्ष अशा वार्षिक पॅकेजवर विद्यार्थ्यांना संधी मिळाल्याचे महाविद्यालायचे प्राचार्य डॉ. योगेश उशीर यांनी सांगितले. 

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, एसएमबीटी शैक्षणिक संकुलात दोन औषधनिर्माण महाविद्यालय आहेत. याठिकाणी तब्बल दरवर्षी १२० विद्यार्थ्याना प्रवेश दिला जातो. दोन्हीही महाविद्यालये गेल्या २० वर्षापासून याठिकाणी सुरु आहेत. तब्बल १५ पेक्षा अधिक प्राध्यापक हे पीएचडी धारक आहे. 

महाविद्यालयात विद्यार्थ्याना शिक्षणासोबतच अनेक प्रकारच्या उपक्रमांत सहभागी करून घेतले जाते, त्यामुळे विद्यार्थ्यामध्ये नेतृत्व गुण आपसूक प्राप्त होतात. तसेच विद्यार्थ्याना वेगवेगळ्या देशामध्ये प्रतिनिधित्व करता येते. त्यामुळे गुणवत्तेतदेखील वाढ आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये ठसा उमटविण्यात विद्यार्थ्याना यश आल्याचे डॉ. उशीर म्हणाले.

एसएमबीटी महाविद्यालयात गेल्या पाच वर्षांत ३०० पेक्षा अधिक विद्यार्थ्याना शिक्षण पूर्ण होण्याआधीच नोकऱ्या मिळाल्या आहेत. विशेष म्हणजे, अनेक विद्यार्थ्यांची इतर देशांमध्ये उच्च शिक्षणासाठी निवड झाली आहे. अनेक ठिकाणी उच्च पदांवर हे विद्यार्थी कार्यरत आहेत. 

वैद्यकीय क्षेत्र जसजसे वाढत चालले आहे, तशी स्पर्धादेखील वाढल्या असून अनेक कंपन्या नवनव्या उपक्रमांत सहभागी विद्यार्थ्याच्या मुलाखतीसाठी दरवर्षी इच्छुक असतात. गेल्या दोन वर्षांत तब्बल ४ वेळा विविध कंपन्यांनी याठिकाणी भेटी देत विद्यार्थ्यांची निवड केली आहे. याठिकाणी स्वतंत्र प्लेसमेंट ड्राईव्ह विभाग असल्यामुळे विद्यार्थीकेंद्रित दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते.

महाविद्यालयाचा बँकॉक येथील महीडॉल युनिव्हर्सिटी, थायलंड येथील प्रिन्स ऑफ सोंग्क्ला युनिव्हर्सिटी, नेपाळ येथील काठमांडू युनिव्हर्सिटी, गंदकी मेडिकल कॉलेज पोखरा नेपाळ, मलेशिया येथील इंटरनॅशनल इस्लामिक युनिव्हर्सिटी, इंडोनेशिया मलाहयाती युनिव्हर्सिटी इंडोनेशिया) व लोट्स होलिस्टिक हेल्थ सेंटर (युएई) यांच्याशी उच्च शिक्षण, संशोधन आणि स्टुडंट एक्स्चेंज करार झालेले झालेले आहेत.

विद्यार्थीकेंद्रित उपक्रमांना प्राधान्य..

शिक्षणासोबत नेतृत्वगुण, संवाद कौशल्य आणि जागतिक व्यासपीठावर सादरीकरण करण्यासाठी महाविद्यालया जीपीएटी, एनआयपीईआर मार्गदर्शन, रिसर्च प्रकल्प, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी विनिमय, सॉफ्ट स्किल ट्रेनिंग, अल्युमनी कनेक्ट, उद्योगदौरे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आदी विद्यार्थ्यांना सशक्त करणारे उपक्रम वर्षभर राबवले जातात.

या कंपन्यांचा समावेश..

सिप्ला, आयपीसीए, एफडीसी, रॅनबॅक्सी, ब्ल्यू क्रॉस, टीसीएस, मॅक्लिओड्स, मायलन, ग्लेनमार्क, ग्लॅक्सो, सायटेक, गिब्स, डब्ल्यूएनएस, अपोलो वेलनेस, सन्डोज आणि युनिकेम लॅबोरेटरी इ. औषधनिर्माण क्षेत्रातील नामाकिंत कंपन्यांचा समावेश आहे.

शिक्षण, संस्कार आणि संधी यांचा संगम..

विद्यार्थ्यानी केवळ शैक्षणिक गुणवत्ता नव्हे, तर औद्योगिक ज्ञान, संवाद कौशल्य, आणि जागतिक स्तरावर प्रतिनिधित्व यामध्ये आपला ठसा उमटवला आहे. आमचे प्रशिक्षित प्राध्यापक, प्रात्यक्षिक उपक्रमांवर आधारित शिक्षण, आणि देशविदेशातील वेगवेगळ्या विद्यापीठांसोबतच्या सहयोगामुळे हे शक्य झाले आहे. असे प्राचार्य डॉ. योगेश उशीर, प्राचार्य यांनी सांगितले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !