बचत गटाच्या माध्यमातून महिलांना सक्षम करणार - आमदार अमोल खताळ
◻️ शहरातील लाडक्या बहिणींनी बांधल्या आमदार खताळ यांना राख्या
संगमनेर LIVE | महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचे राज्य सरकारने धोरण अवलंबिले आहे. त्यानुसार शहर व तालुक्यातील महिलांना महिला बचत गटाच्या माध्यमातून व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रयत्न केला जाईल. अशी ग्वाही आमदार अमोल खताळ यांनी दिली.
शहरातील पद्मानगर हिंदूतरुण मित्र मंडळ आणि पद्मश्री मित्र मंडळाच्या वतीने आमदार अमोल खताळ समर्थक शशांक नामन यांच्या मार्गदर्शनाखाली रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी शेकडो लाडक्या बहिणींनी आमदार खताळ यांना राखी बांधत बहिण - भावाचं नातं अधिकच दृढ केल.
शिवसेनेच्या दिपाली वाव्हळ व चंद्रकला दासरी यांनी या भागातील समस्याचा पाढा वाचला असता, आमदार खताळ म्हणाले की, “जसे तुम्ही माझ्या सारख्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला विधानसभेमध्ये तुमची सेवा करण्यासाठी पाठवलं. तसेच आगामी नगरपालिका निवडणुकीमध्ये तुमच्याच भागातील एक तरुण नगर सेवक म्हणून नगरपालिकेत पाठवा. तो तुमच्या समस्या सोडवल्याशिवाय राहणार नाही.” असे आवाहन केले.
मला सखी बहीण नाही, त्यामुळे प्रत्येक रक्षाबंधनला मावस बहीण आणि चुलत बहीणी ओवाळायला यायची मला वाट पहावी लागत होती. परंतु तुमच्या सर्व आशीर्वादाने मी या तालुक्याचा आमदार झाल्यानंतर माझ्या एवढ्या लाडक्या बहिणींनी मला राख्या बांधून बहिण भावाचा नात घट्ट केलं. त्यांची ऋण मी कधीच विसरणार नाही. यावेळी आमदार अमोल खताळ भावुक झाल्याचे पाहावयास मिळाले.