मांचीहिल येथील अश्विन आयुर्वेद महाविद्यालयाचा शंभर टक्के निकाल
◻️ बीएएमएस च्या चतुर्थ वर्षाचे सर्व ५७ विद्यार्थी उत्कृष्ट गुणांनी उत्तीर्ण
संगमनेर LIVE (आश्वी) | महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांचे अंतर्गत उन्हाळी - २०२५ परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये संगमनेर तालुक्यातील मांचीहिल शैक्षणिक संकुलातील अश्विन ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालयातील चतुर्थ वर्षातील बी.ए.एम.एस. चे एकूण सर्व ५७ विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. त्यामुळे या वर्षी देखील महाविद्यालयाने शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे.
या यशाबद्दल विद्यार्थ्यासह त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे मांचीहिल संस्थानचे संस्थापक अॅड. शाळीग्राम होडगर, विश्वस्त डॉ. शैलेन्द्रसिंह होडगर, विश्वस्त डॉ. दिग्विजयसिंह होडगर, संचालिका नीलिमा गुणे, अध्यक्ष विजय पिसे, उपाध्यक्ष अण्णासाहेब बलमे, प्राचार्य डॉ. श्यामल निर्मळ, डॉ. संजीव लोखंडे, उपप्राचार्य डॉ. शिवपाल खंडीझोड, डॉ. जितेंद्र शिंपी, डॉ. चंद्रकांत गिरगुणे, डॉ. अविनाश जाधव, रुग्णालयाचे डॉ. राजन कुलकर्णी, डॉ. वाघमोडे, डॉ. बालोटे, प्रशासकीय अधिकारी दत्ता शिंदे यांच्यासह संपूर्ण मांचीहिल परिवाराने अभिनंदन करत भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.