पिंप्री - लौकी अजमपूर येथील अक्षदा गिते हिचे बीएएमएस परीक्षेत सुयश!
◻️ आश्वी सह पंचक्रोशीतून कु. अक्षदा गिते हिच्यावर कौतुकाचा वर्षाव
संगमनेर LIVE (आश्वी) | महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक अंतर्गत उन्हाळी - २०२५ परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये संगमनेर तालुक्यातील मांची हिल शैक्षणिक संकुलातील अश्विन ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या कु. अक्षदा रंगनाथ गिते हिने बी.ए.एम.एस. ची अंतिम वर्षाची परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली आहे.
कु. अक्षदा गिते हि तालुक्यातील पिंप्री - लौकी अजमपूर येथील मुळ रहिवासी आहे. तिचे वडील रंगनाथ गिते हे मांचीहिल संकुलात कार्यालयीन अधीक्षक पदावर कार्यरत आहेत. तर, आई सौ. नंदिनी गिते या दाढ बुद्रुक येथील महात्मा फुले विद्यालयात शिक्षिका म्हणून ज्ञानदानाचे कार्य करत आहे.
कु. अक्षदाने अतिशय मेहनत आणि जिद्दीतून हे शिक्षण पूर्ण केले असून तिच्या या यशाची माहिती मिळताच चुलते गोरक्षनाथ गिते व आजोबा सेवानिवृत्त मेजर जनार्दन फड यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. तर, मुलीच्या या यशाबद्दल कौतुक करताना आई आणि वडीलांना देखील शब्द अपुरे पडत असल्याचे चित्र पहावयास मिळाले.
अक्षदाच्या या यशाबद्दल मांचीहिल संस्थानचे संस्थापक अॅड. शाळीग्राम होडगर, विश्वस्त डॉ. शैलेन्द्रसिंह होडगर, विश्वस्त डॉ. दिग्विजयसिंह होडगर, संचालिका नीलिमा गुणे, अध्यक्ष विजय पिसे, उपाध्यक्ष आण्णासाहेब बलमे, प्राचार्य डॉ. श्यामल निर्मळ, डॉ. संजीव लोखंडे, उपप्राचार्य डॉ. शिवपाल खंडीझोड, जनसंपर्क अधिकारी प्रा. दत्ता शिंदे यांनी अभिनंदन केले आहे.
दरम्यान ग्रामीण भागातील आणि विशेषतः सर्व साधारण कुटुंबातील मुलगी डॉक्टर झाल्याबद्दल पिंप्री - लौकी अजमपूर सह आश्वी पंचक्रोशीतून देखील कु. अक्षदावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.