अश्विन महाविद्यालयाचे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत नेत्रदीपक यश!
◻️ श्रीरामपुर येथे ६३ व्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न
संगमनेर LIVE (आश्वी) | श्रीरामपुर येथील चंद्ररूप डाकले जैन कॉलेज ऑफ कॉमर्स यांच्या वतीने आयोजित पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील ६३ व्या राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. या स्पर्धेमध्ये संगमनेर तालुक्यातील मांचीहिल शैक्षणिक संकुलातील अश्विन कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील कु. शरयू कापडी या महाविद्यालयीन विद्यार्थीनीने नैत्रदीपक यश संपादित केले.
कु. शरयू शरद कापडी ही मांची हिल येथील महाविद्यालयात एस.वाय. बीएसी च्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे. तिने नुकत्याच पार पडलेल्या ६३ व्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत ‘कर्मवीर भाऊराव पाटील : एक द्रष्टा ज्ञानयोगी’ या विषयावर प्रभावी भाषण सादर करत उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. विशेष म्हणजे या स्पर्धेत राज्यभरातील विविध महाविद्यालयांतील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यावेळी कु. शरयू हिचे भाषणाचे यश उल्लेखनीय ठरले आहे.
दरम्यान कु. शरयु च्या यशाबद्दल संस्थेचे प्रमुख अॅड. शाळीग्राम होडगर, प्राचार्य डॉ. मोहन मोरे, संचालिका नीलिमा गुणे, संस्थेचे अध्यक्ष विजय पिसे, उपाध्यक्ष आण्णासाहेब बलमे, प्रा. सुनिल आढाव, विभाग प्रमुख दिलीप कारंडे, उप प्राचार्य राजेंद्र हिंगे यांनी अभिनंदन केले आहे. तसेच कु. शरयुला प्राचार्य डॉ. मोहन मोरे आणि प्राध्यापिका स्नेहल आव्हाड यांचे मार्गदर्शन लाभले होते.