आश्वी महाविद्यालयात पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती साजरी
संगमनेर LIVE (आश्वी) | संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील प्रवरेच्या कला, वाणिज्य, विज्ञान आणि संगणक शास्त्र महाविद्यालयात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती ‘अंत्योदय दिवस’ म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. देविदास दाभाडे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आदिनाथ घोलप यांनी केले. वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. वैभव गायकवाड यांनी प्रमुख व्याख्याते म्हणून दीनदयाळ उपाध्याय यांच्या बद्दल एकात्म मानववाद, जीवनमूल्ये, राजकीय कार्य, सामाजिक कार्य, वैयक्तिक जीवन, व त्यांचे राष्ट्राबदल असलेले कर्तव्य बाबत विद्यार्थ्याना माहिती दिली.
दरम्यान या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वर्षा गायकर यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.