थोरात कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी राबवले श्रमदान व स्वच्छता अभियान
◻️ भारत सरकारच्या सेवा पंधरवड्यातर्गत राबवले श्रमदान व स्वच्छता अभियान
संगमनेर LIVE | कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सर्व अधिकारी व कर्मचारी यानी स्वच्छता ही सेवा पंधरवड्यातर्गत श्रमदान व स्वच्छता अभियान राबवले.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या प्रशासकीय इमारतीच्या दक्षिण बाजूला सर्व कारखाना अधिकारी व कर्मचारी यांच्यावतीने भारत सरकारच्या देशव्यापी स्वच्छता अभियानांतर्गत ‘एक दिन एक घंटा एक साथ स्वच्छता’ व श्रमदान अभियान राबविण्यात आले. यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, सेक्रेटरी किरण कानवडे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
देशातील सहकारासाठी मॉडेल ठरलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने कायम ऊस उत्पादक सभासद शेतकरी व कामगार यांच्या जीवनात आनंद निर्माण केला आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन अद्यावत प्रशासकीय इमारत कार्यान्वित झाली आहे. याचबरोबर भारत सरकारच्या देशवापी स्वच्छता ही सेवा या पंधरवाडा अंतर्गत एक दिन एक घंटा एक साथ सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी कारखाना परिसरात स्वच्छता अभियान राबवले. यावेळी कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी सर्व कर्मचाऱ्यांना स्वच्छतेची शपथ दिली.
जगन्नाथ घुगरकर म्हणाले की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श शिस्तीवर कारखान्याची वाटचाल सुरू आहे. देशातील आणि राज्यातील सर्व सहकारी साखर कारखान्यासाठी आदर्शवत असे काम थोरात कारखान्याचे राहिले आहे. स्वच्छता हा सेवाभाव आहे आणि प्रत्येकाने सार्वजनिक स्वच्छतेमध्ये योगदान दिले पाहिजे. केंद्र शासनाने २०१७ पासून सेवा पंधरवाडा योजना सुरू केली असून या अंतर्गत दरवर्षी कारखान्याचे कर्मचारी स्वच्छता अभियान राबवत असतात. कारखान्याचा सर्व परिसर हा हिरवाईने नटलेला असून कायम स्वच्छ आहे. यापुढील काळातही जेथे जेथे शक्य आहे त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी सार्वजनिक स्वच्छता अभियानात सहभाग घ्यावा असे आवाहन केले.
दरम्यान या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेक्रेटरी किरण कानवडे यांनी केले. यावेळी अधिकारी कर्मचारी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.