श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा
संगमनेर LIVE (तुळजापुर) | श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन अत्यंत उत्साहात आणि सन्मानपूर्वक साजरा करण्यात आला. मंदिर संस्थानच्या तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर सामूहिक राष्ट्रगीत आणि राज्यगीताचे गायन करण्यात आले.
मराठवाडा मुक्ती संग्राम दिन हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा राजकीय आणि ऐतिहासिक दिवस आहे. १७ सप्टेंबर १९४८ रोजी ‘ऑपरेशन पोलो’ अंतर्गत हैदराबाद संस्थानातील निजामशाहीचा अंत झाला आणि मराठवाडा भाग भारतात विलीन झाला. हा दिवस त्या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी साजरा केला जातो.
दरम्यान या विशेष प्रसंगी मंदिर पोलीस चौकी आणि मंदिर संस्थानचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.