प्रवरा कन्या विद्या मंदिरचा फुटबॉल संघ विभागीय पातळीवर अजिंक्य
◻️ राज्य पातळीवर संघाची निवड झाल्याची प्राचार्य सौ. घोरपडे यांची माहिती
संगमनेर LIVE (लोणी) | पुणे विभागीय शालेय फुटबॉल स्पर्धत १९ वर्ष वयोगटात लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील प्रवरा कन्या विद्या मंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालयांचा फुटबॉल संघ हा विभागीय पातळीवर अजिंक्य ठरला आहे. या संघाची आता राज्य पातळीवर निवड झाल्याची माहिती प्राचार्य सौ. विद्या घोरपडे यांनी दिली.
प्रवरा कन्या विद्या मंदिरच्या मैदानावर पार पडलेल्या स्पर्धेत पुणे शहर, नगर शहर, नगर ग्रामीण, पुणे ग्रामीण, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, सोलापूर शहर आणि सोलापूर ग्रामीण अशा एकूण सात संघांचा समावेश होता. यावेळी प्रवरा कन्या विद्यामंदिरचा(नगर ग्रामीण) पहिला सामना सोलापूर ग्रामीण बरोबर झाला यामध्ये ६-० विजयी झाला, तर सेमी फायनल पुणे ग्रामीण सोबत प्रवरा कन्या विद्या मंदिर चा संघ ४-० ने विजयी झाला. तसेच अंतिम सामना नगर ग्रामीण (प्रवरा कन्या विद्या मंदिर) विरुद्ध पुणे शहर (सिम्बॉयसिस इंटरनॅशनल स्कूल) यांच्यात होऊन प्रवरा कन्या विद्या मंदिरचा संघ २-० ने आघाडी घेत विजयी झाला.
प्रवरा कन्या विद्या मंदिर चा संघ राज्य पातळी असून राज्यस्तरासाठी पात्र ठरला आहे. या संघात अक्षरा आघाडे, आकांक्षा आमटे (गोलकीपर), रेवती कानतुटे, समृद्धी जंगले, अंजली जाधव, संस्कृती गायके, प्राची बोरसे, कार्तिकी आमटे, ज्ञानेश्वरी रिंढे, वैष्णवी चेमटे, प्रांजल अंभोरे, आरती शेळके, पुनम मिसाळ, हर्षदा तातळे, आराध्या सुकटे यांचा समावेश होता. या संघाला फुटबॉल कोच सौ. विद्या घोरपडे, जयश्री मेंढे, हॉकी कोच कल्पना कडू, स्विमिंग कोच सुचित्रा तांबे, व्हॉलीबॉल कोच गौरी दळे यांचे मार्गदर्शन लाभले.
संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील यांच्या प्रेरणेमुळेच आम्हाला हे यश मिळवता आले. आम्हा मुलींसाठी प्रवरा कन्या विद्या मंदिर च्या माध्यमातून विशेष सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळेच आम्ही आज राज्य पातळीवरती पोहोचलो असल्याची प्रतिक्रिया अक्षरा आघाडे यांनी दिली.
दरम्यान या यशस्वी खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष डाॅ. सुजय विखे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील, सहसचिव भारत घोगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, शिक्षण संचालिका संचालिका सौ. लीलावती सरोदे यांनी अभिनंदन केले आहे.