व्यापाऱ्यांना त्रास देणाऱ्यांचा बंदोबस्त करणार - आमदार अमोल खताळ

संगमनेर Live
0
व्यापाऱ्यांना त्रास देणाऱ्यांचा बंदोबस्त करणार - आमदार अमोल खताळ

◻️ संगमनेर व्यापारी असोशिएशनचे आमदार खताळ यांना निवेदन

संगमनेर LIVE | संगमनेरची बाजारपेठ व्यापाऱ्यांच्या त्यागातून व कष्टातून फुलली आहे. सध्या सण उत्सवाचे दिवस सुरू आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी आपली एकजूट कायम दाखवावी. जर विनाकारण संगमनेरच्या व्यापाऱ्यांना ब्लॅकमेल करून विनाकारण कोणी त्रास देत असेल तर त्यांचा बंदोबस्त केला जाईल. असा इशारा आमदारअमोल खताळ यांनी दिला.

संगमनेर शहरातील मोहनलाल बन्सीलाल दर्डा यांच्यामार्फत एका किरकोळ किराणा विक्री दुकानात भेसळयुक्त गुळ विक्री होत असल्याची तक्रार अहिल्यानगर येथील अन्न आणि औषध प्रशासन विभागाला केली होती. त्यानंतर औषध आणि प्रशासन विभागाचे अधिकाऱ्यांनी संगमनेरला येऊन दर्डा यांच्या सिद्धी शुद्ध नैसर्गिक गुळाची तपासणी केली. 

त्याचे नमुने शासकीय प्रयोगशाळेमध्ये तपासण्यात आले. त्यात सदरचा गुळ हा प्रमाणित असल्याबाबत तपासात सिद्ध झाले. त्याचा अहवाल प्रमाणपत्र अन्न व औषध प्रशासन विभागाकडून प्राप्त झाले आहे. तरी, सुद्धा काहीजण दर्डा बंधूंना विनाकारण त्रास देत आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी संगमनेर व्यापारी असोसिएशनच्या वतीने आमदार अमोल खताळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

अमोल खताळ म्हणाले की, संगमनेर शहरातील व्यापाऱ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची मी वेळोवेळी काळजी घेत आहे. जर संगमनेरचे व्यापारी चुकीचे वागत असेल तर, त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे या मताचा मी आहे. परंतु विनाकारण जर व्यापाऱ्याला ब्लॅकमेल करून काहीजण त्रास देऊन आपल्या तुंबड्या भरण्याचे काम करत आहे. अशा अनेक तक्रारी माझ्याकडे प्राप्त झालेल्या आहेत. मात्र जर येथून पुढील काळात जर कोणी व्यापाऱ्यांना ब्लॅकमेल करून त्रास देण्याचा प्रयत्न केला. तर त्यांनी थेट माझ्याशी संपर्क साधावा व्यापाऱ्यांच्या पाठीमागे राज्यातील महायुती सरकार आणि संगमनेरचा लोकप्रतिनिधी या नात्याने मी भक्कमपणे उभा राहील, असे ठणकावले.

संगमनेरच्या व्यापाऱ्यांनी त्यागातून व कष्टातून ही संगमनेरची बाजारपेठ उभी केली आहे. त्यामुळे जर चुकीचे काम करणाऱ्यांना अधिकारी पाठबळ देत असेल तर त्या अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई केली जाईल. असा इशारा देत आमदार खताळ म्हणाले की, जर येथून पुढे कोणी व्यापाऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केला तर, त्यांना महायुती स्टाईलने उत्तर दिले जाईल. सध्या येथून पुढे जर, कोणी व्यापाऱ्यांना त्रास देत असेल तर त्यांच्यावर निश्चितच कडक कायदेशीर कारवाई करण्याबाबतच्या सूचना  अन्न औषध प्रशासन व पोलीस प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत. येथून पुढील काळात संगमनेर दहशतमुक्त व भयमुक्त होण्यासाठी सर्व व्यापाऱ्यांनी एकत्रित राहुन ही एकजूट कायम दाखवावी असे आाहन केले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !