धार्मिक कार्यातून काम करण्याची ऊर्जा मिळते - आमदार अमोल खताळ
◻️ काकडवाडी येथील महालक्ष्मी मातेचे नवरात्रोत्सवानिमित्त घेतले दर्शन
संगमनेर LIVE | सर्वसामान्य जनतेची कामे करण्यासाठीची उर्जा ही गावा-गावामध्ये होणारे अखंड हरिनाम सप्ताह, गणेशोत्सव आणि नवरात्र उत्सव यासारख्या धार्मिक कार्याच्या माध्यमातून मिळत असे. प्रतिपादन आमदार अमोल खताळ यांनी केले.
संगमनेर तालुक्यातील काकडवाडी येथील महालक्ष्मी माता मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त आभिजीत महाराज गिरी यांच्या वाणीतून नवनाथ महाराजांची संगीत सुरू आहे या कथेसाठी उपस्थित असलेल्या भावीक भक्तांना मार्गदर्शन करताना आमदार खताळ बोलत होते. यावेळी आमदार खताळ यांनी महालक्ष्मी मातेचे दर्शन घेतले.
आमदार खताळ पुढे म्हणाले की, संगमनेर तालुक्यासह आसपासच्या परिसराचे एक जागृत देवस्थान म्हणून काकडवाडीचे महालक्ष्मी देवस्थान ओळखले जाते. या देवीच्या दर्शनासाठी मी नित्यनेमाने येत असतो. ज्यावेळी मी महालक्ष्मी मातेचे दर्शन घेत होतो. तेव्हा तेथेच मला विधान सभेची उमेदवारी जाहीर झाली असल्याचे समजले. त्यानंतर विधानसभा निवडणुकीमध्ये देवीच्या कृपा आशीर्वादानेच तालुक्याचे लोक प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. भविष्यात तालुक्यातील जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी शक्ती द्यावी, अशी प्रार्थना महालक्ष्मी मातेच्या चरणी केली असल्याचे सांगितले.
ते पुढे म्हणाले, तळेगाव आणि निमोण भागातील जनतेला आपण पाणी देणारच हा शब्द याचं ठिकाणी दिला होता. तो पाण्याचा प्रश्न मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून मार्गी लावल्याचा आनंद आहे. या भोजापुर चारीचे पाणी सर्वच गावांना समान प्रमाणात कसे मिळेल याबाबत आपण अधिकाऱ्यांना सूचना दिल्या असल्याचे देखील आमदार खताळ यांनी सांगितले.
दरम्यान तुम्ही प्रथम दर्शनाला आला तेव्हा तुम्हाला उमेदवारी मिळाली, दुसऱ्यांदा आलात तेव्हा तुम्ही तालुक्याचे आमदार म्हणून परंतू तुम्ही तिसऱ्यांदा दर्शनासाठी याल तेव्हा मंत्री म्हणून याल. अशा भावना महालक्ष्मी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष भाऊसाहे महाराज झुरळे यांनी व्यक्त केल्या.