नवरात्र उत्सवानिमित्त माहूर येथील रेणुका मातेची मंत्री विखे पाटील यांनी केली महापूजा
◻️ भक्ती आणि शक्तीचा उत्सव सर्वाना प्रेरणा आणि संकटातून सावरण्याचे बळ देवो - मंत्री विखे पाटील
संगमनेर LIVE (लोणी) | श्री क्षेत्र माहूर येथे रेणुका मातेची महापूजा करून जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी नवरात्र उत्सवास प्रारंभ केला.
भक्ती आणि शक्तीचे हे मंगलमय पर्व सर्वाच्या आयुष्यात नवी प्रेरणा आणि सर्व संकटातून सावरण्यासाठी बळ देणारे ठरो. आशी प्रार्थना करून त्यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
दरवर्षी प्रमाणे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि सौ. शालीनी विखे पाटील यांनी नवरात्र उत्सवाच्या पहील्या माळेलाच माहूर येथील रेणुका मातेची महापूजा करून दर्शन घेतले. मंदिराच्या विश्वस्त समितीच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.
नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने मंत्री विखे पाटील यांचे सांयकाळी नांदेड विमानतळावर आगमन झाले. जिल्हाधिकारी राहूल कर्डीले, नांदेड महानगर भाजपाचे अध्यक्ष अमर राजूरकर, पद्मश्रीं डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परीषदेचे अध्यक्ष भागवत देवसरकर यांच्यासह कार्यकर्त्यानी स्वागत केले.
राज्यात परंपरेने शारदीय नवरात्र उत्सवास प्रारंभ झाला असून या मंगलमय सोहळ्याच्या सर्व भाविकांना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. भक्ती आणि शक्तीचा संगम म्हणून नवरात्र उत्सवाकडे आपण संस्कृती परंपरा आणि अध्यात्मिक दृष्ट्या राज्यातील सर्व भागात नवरात्र उत्सव साजरा केला मंगलमय पर्वाच्या निमिताने सर्वाना शुभेच्छा देताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, या उत्सवाच्या निमित्ताने सर्वाना एक नवी प्रेरणा मिळेल तसेच येणारी संकट आणि आव्हानावर मात करण्यासाठी भवानी मातेन आम्हाला शक्ती देवो आशी प्रार्थना आहे.
विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने वस्तू सेवा कर कमी नव्या कर रचनेची भेट देशातील जनतेला दिली असल्याचे सांगून मंत्री विखे पाटील म्हणाले की यानिमित्ताने बचत उत्सवाच्या पर्वाची सुरूवात झाली आहे.
स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात पंतप्रधान यांनी केलेल्या घोषणेची नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने सुरू झालेली अंमलबजावणी सामान्य माणसाला मोठा दिलासा देणारी आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला आत्मनिर्भरतेन अधिक पुढे घेवून जाण्यासाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.