संगमनेर शहर पोलीसांनी जप्त केलेल्या १६४ बेवारस वाहनाचा लिलाव
◻️ गुरुवारी १८ सप्टेंबर रोजी पोलीस वसाहत येथे होणार जाहीर लिलाव
संगमनेर LIVE | संगमनेर शहर पोलीस स्टेशन येथे एकण १६४ जप्त चार, तीन व दोन चाकी बेवारस वाहनाचा गुरुवार दिनांक १८ सप्टेंबर २०२५ रोजी पोलीस वसाहत येथे जाहीर लिलावाद्वारे विक्री करण्यात येणार आहे. असल्याची माहिती पोलीस निरीक्षक यांनी कळवली आहे.
हि बेवारस वाहने घेऊ इच्छिणारे ब्यक्तीनी लिलावात सहभाग होण्याकारीता ५० हजार रुपये डिपॉजीट रक्कम हि बुधवार दिनांक १७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ०६ वाजेपर्यत संगमनेर शहर पोलीस स्टेशन येथे जमा करावी. तर, त्यानतंर आलेल्या व्यक्तीचा विचार केला जाणार नाही.
दरम्यान सर्व बेवारस वाहनाचे इंजीन नबंर, चेसी नबंर सह सविस्तर यादी संगमनेर शहर पोलीस स्टेशनच्या नोटीस बोर्डावर लावण्यात आली आहे. तसेच लिलाव बाबतच्या अटी व शर्ती देखील नोटीस बोर्डावर लावण्यात आल्या आहेत.