लोणी येथील प्रवरा ग्रामीण औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयात रक्तदान शिबिर
◻️ राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विद्यार्थ्याचा उत्स्फूर्त सहभाग
संगमनेर LIVE (अहिल्यानगर) | डॉ. विठ्ठलराव विखे पाटील हॉस्पिटल, अहिल्यानगर यांच्या ब्लड बँक विभागाच्या वतीने प्रवरा ग्रामीण औषध निर्माणशास्त्र महाविद्यालय, लोणी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग लाभला.
महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सौ. मंगाथायारू यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी एनएसएस कार्यक्रम प्रमुख डॉ. मयूर भोसले, शुभम म्हस्के, रोहित भोर, डॉ. प्रसाद विखे, डॉ. सागर मगर, डॉ. गौरव डामरे आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. विखे पाटील हॉस्पिटलच्या ब्लड बँकेच्या वतीने डॉ. प्रतीक्षा चेवले, डॉ. संयमी शिंगोटे, डॉ. वैष्णवी काळे, समाजसेवा विभागाचे समन्वयक गौतम सगळगिळे, ब्लड बँक टेक्निशियन रुचिका गुळवे, मोनिका गोयेकर, नर्सिंग स्टाफ विजया बागल यांनी शिबिराच्या यशासाठी विशेष परिश्रम घेतले.
विद्यार्थ्यानी रक्तदान करताना शिक्षण, समाजसेवा आणि राष्ट्रकार्य यांचा सुंदर संगम साधला. एकूण ४५ विद्यार्थ्यांनी रक्तदान करून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले. त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद आणि अभिमान समाजसेवेच्या मूल्यांना अधोरेखित करणारा होता.
रक्तदान हे जीवनदान आहे. एक थेंब रक्त अनोळखी जीवाला नवी उमेद आणि जीवन देऊ शकते. तरुणाईने समाजकार्यात पुढाकार घेतल्यास राष्ट्र अधिक सशक्त आणि संवेदनशील होईल.