बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत सहकारी संस्थांच्या वार्षिक सभा
◻️ शुक्रवारी मार्केट कमिटी व राजहंस दूध संघ तर शनिवारी अमृतवाहिनी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा
◻️ रविवारी थोरात सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा
संगमनेर LIVE | संपूर्ण देशासाठी सहकाराचे आदर्श मॉडेल ठरलेल्या अमृत उद्योग समूहामधील विविध सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य लोकनेते बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या उपस्थितीमध्ये शुक्रवार दि. १२ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर २०२५ या कालावधीत कारखाना कार्यस्थळावरील कारखान्याच्या नवीन प्रशासकीय इमारती समोरील अमृतेश्वर मंदिराच्या प्रांगणात होणार आहे.
स्वातंत्र्यसेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श विचारांवर संगमनेर मधील अमृत उद्योग समूहातील विविध सहकारी संस्थांचे कामकाज हे देशासाठी उत्तम मॉडेल ठरले आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली या सर्व सहकारी संस्थांमधून तालुक्याच्या ग्रामीण विकासासह शेतकरी, उत्पादक, नागरिक, महिला, व्यापारी, कामगार या सर्वांचा विकास साधला जात असून या सहकारी संस्थांमुळे तालुक्याची अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे.
या आदर्शवत सर्व सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा १२ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर या काळात कारखान्याच्या नवीन प्रशासकीय इमारती समोरील अमृतेश्वर मंदिराजवळील प्रांगणात माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे व तालुक्यातील सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. शुक्रवारी १२ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वा. संगमनेर सहकारी शेतकी संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन संपतराव डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली तर १० वा. कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा सभापती शंकरराव खेमनर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. तसेच सकाळी ११ वा. संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन रणजीतसिंह देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
शनिवारी १३ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वा. राजेंद्र गुंजाळ यांच्या अध्यक्षतेखाली हरिश्चंद्र फेडरेशनची वार्षिक सर्वसाधारण सभा तर सकाळी १० वाजता राजेंद्र कडलग यांच्या अध्यक्षतेखाली गरुड कुकूटपालन सहकारी संस्थेची वार्षिक सभा होणार आहे तर, सकाळी ११ वा. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन सुधाकर जोशी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
रविवारी दुपारी १ वाजता सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सभा साधारण सभा कारखान्याचे विद्यमान चेअरमन लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
या सर्व वार्षिक सर्वसाधारण सभांना आमदार सत्यजीत तांबे, युवक काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ. जयश्रीताई थोरात, ॲड. माधवराव कानवडे, बाजीराव खेमनर, सौ. दुर्गाताई तांबे, इंद्रजीत थोरात, रामहरी कातोरे, हौशीराम सोनवणे यांच्यासह अमृत उद्योग समूहातील सर्व संस्थांचे पदाधिकारी व तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान या वार्षिक सर्वसाधारण सभांसाठी सभासद व उत्पादक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कारखान्याचे व्हा. चेअरमन पांडुरंग घुले, दूध संघाचे व्हा. चेअरमन राजेंद्र चकोर, बँकेचे व्हा. चेअरमन ॲड. नानासाहेब शिंदे, शेतकी संघाचे व्हा. चेअरमन सुनील कडलग, मार्केट कमिटीचे उपसभापती गीताराम गायकवाड, कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांच्यासह थोरात सहकारी साखर कारखाना कारखाना, राजहंस दूध संघ, अमृतवाहिनी बँक, शेतकी संघ, हरिश्चंद्र फेडरेशन, गरुड कुक्कुटपालन या सर्व सहकारी संस्थांच्या संचालक मंडळ व कार्यकारी संचालक यांनी केले आहे.