बिबट्याच्या हल्ल्यातील जखमी विद्यार्थीनीची बाळासाहेब थोरात यांनी घेतली भेट

संगमनेर Live
0
बिबट्याच्या हल्ल्यातील जखमी विद्यार्थीनीची बाळासाहेब थोरात यांनी घेतली भेट

◻️ प्रभावी उपाय योजना लागू करण्यासाठी वनमंत्र्याशी बाळासाहेब थोरात बोलणार 


संगमनेर LIVE | डिग्रस येथील इयत्ता नववीत शिकणारी प्रगती सखाराम श्रीराम ही विद्यार्थिनी शाळेत जात असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने तिच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्रगतीची बाळासाहेब थोरात यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेतली. तर, उपचाराबाबत माहिती जाणून घेत कुटुंबाला धीर दिला.

संगमनेर शहरातील खाजगी रुग्णालयात प्रगतीवर उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी रुग्णालयात जाऊन जखमी प्रगतीच्या उपचाराबाबत माहिती जाणून घेतली. तसेच तिच्या पालक आणि नातेवाईक यांच्याशी त्यांनी संवाद साधला.

डिग्रस येथील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात विद्यालयात इयत्ता नववीच्या वर्गात शिकणारी प्रगती ही सकाळी शाळेत जात होती. यावेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने तिच्यावर अचानक हल्ला केला होता. या हल्ल्यामध्ये प्रगती गंभीर जखमी झाली. पाठोपाठ येत असलेले प्रगतीचे मामा देवराम खेमनर यांनी क्षणाचाही विलंब न करता थेट मोटरसायकल शेतामध्ये घातली. हॉर्न वाजून मोठा आरडाओरडा केल्यानंतर बिबट्याने प्रगतीला सोडून पळ काढला. बिबट्याने केलेल्या हल्ल्यामध्ये प्रगतीच्या मानेला मोठ्या जखमा झाल्या आहेत. ही बातमी कळताच डिग्रस व परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

यानंतर लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी रुग्णालयात जाऊन प्रगतीच्या तब्येतीची चौकशी केली. याप्रसंगी तिच्याशी संवाद साधून तिला खंबीर राहण्याचा सल्ला दिला याचबरोबर प्रगतीचे मामा देवराम खेमनर यांनी दाखवलेल्या धाडसाचेही त्यांनी कौतुक केले.

याप्रसंगी लोकनेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, सध्या बिबट्यांचे वाढते हल्ले हे अत्यंत चिंताजनक आहे. बिबटे मानवी वस्तीत शिरत असून वन विभागाने यावर अत्यंत प्रभावी उपाय योजना करण्याचे गरजेचे आहे. याबाबत आपण वनमंत्र्यांशी बोलणार असल्याचे ते म्हणाले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !