पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वदेशी वापराचे प्रतिबिंब ‘बिझनेस एक्स्पो’मध्ये!

संगमनेर Live
0
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वदेशी वापराचे प्रतिबिंब ‘बिझनेस एक्स्पो’मध्ये!

◻️ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते ‘बिझनेस एक्स्पो प्रदर्शना’चे उद्घाटन


संगमनेर LIVE (लोणी) | प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्याच्या सहभागाने आयोजित करण्यात आलेल्या बिझनेस एक्स्पो मध्ये सौर उर्जेपासून ते स्वदेशीपर्यत आणि फुड टेन्काॅलाॅजीपासून ते सेंद्रीय उत्पादनाच्या बाबतीत महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा दृष्टीकोन आणि मार्केटींग स्कीलचे जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी कौतुक केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना दिपावलीच्या निमिताने स्थानिय उत्पादनांच्या खरेदीच्या केलेल्या आवाहनाला यामुळे प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीने सलग दुसऱ्या वर्षी विद्यार्थ्याच्या सहभागाने आयोजित केलेल्या बिल्डिंग प्रवरा या संकल्पनेतून बिझनेस एक्स्पो प्रदर्शनाचे औपचारिक उद्घाटन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनी विखे पाटील, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील, सहसचिव भारत घोगरे, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, डाॅ. शिवानंद हिरेमठ, डाॅ. प्रदीप दिघे, डाॅ. महेश खर्डे, आर. ए. पवार, सौ. लिलावती सरोदे यांच्यासह अन्य पदाधिकार्यांच्या उपस्थितीत झाले. आंतरराष्ट्रीय कन्या दिनाचे औचित्य साधून विद्यार्थीनीच्या हस्ते दिप्रज्वलन करण्याचा मान देण्यात आला.

बिझनेस एक्स्पो मधील सुमारे १८० स्टाॅल उभारण्यात आले आहेत. प्रत्येक स्टाॅलवर स्थानिक उत्पादनापासून नामवंत कंपन्याची दुचाकी वाहन इलेक्ट्रीक वाहन विक्री आणि बुकींगसाठी विद्यार्थ्यानी ठेवली आहेत. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर पणत्या पासून ते मंत्री रांगोळ्या पर्यत तसेच कपडे सजावट साहीत्य सेंद्रीय पध्दतीने बनविलेल्या उदबत्या धूप इलेक्ट्रिकाॅनिक वस्तू यांच्यासह खाद्य पदार्थांच्या विक्रीच्या स्टाॅलची रेलचेल या बिझनेस एक्स्पो मध्ये पाहायला मिळत आहे.

कृषी शिक्षण घेत असलेल्या महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थीनीनी फळभाज्या फुलांच्या रोपांच्या विक्रीला प्राधान्य दिल्याचे पाहायला मिळाले. दूध उत्पादन वाढीसाठी आवश्यक असलेले खाद्य सेंद्रीय गुळ गावठी तूप या बरोबरीनेच घरगुती व्यवसायातून तयार करण्यात आलेल्या वस्तूनी सर्व ग्राहकांची पसंती मिळवली आहे. मागील दोन दिवसात संस्थेतील विद्यार्थी शिक्षक तसेच नागरीकांनी भेटी देवून मोठ्या प्रमाणात खरेदीचा आनंद घेत आहे. अनेक स्टाॅल वरील माल संपल्यामुळे विद्यार्थ्याना पुन्हा माल खरेदी करून आणावा लागला. डॉ विखे पाटील आयुर्वेद महाविद्यालयाने तयार केलेल्या आयुर्वेदीय उटणे साबण आणि अन्य उत्पादनांना दिपावली निमित मोठी मागणी आहे.

मंत्री विखे पाटील यांनी प्रत्येक स्टाॅलवर भेट देवून विद्यार्थ्याशी संवाद साधला. हा स्टाॅल उभारणी मागची संकल्पना, मार्केटिंगच्या दृष्टीने उपलब्ध बाजारपेठ आशा सर्व विषयांवर विद्यार्थ्याच्या संकल्पना जाणून घेत विखे पाटील यांनी काही सूचना केल्या. अनेक स्टाॅलवर त्यांनी स्वतः खरेदीचा आनंद घेतला.

सलग दुसऱ्या वर्षी डॉ. सुस्मिता विखे पाटील यांच्या संकल्पनेतून बिझनेस एक्स्पो आयोजित करण्यात आल्याबद्दल प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मंत्री टिमचे मंत्री विखे पाटील यांनी अभिनंदन करून विद्यार्थ्याचा एक्स्पो मधील सहभाग उत्साह वर्धक असून बिझनेस करण्याच्या विद्यार्थ्यांच्या संकल्पना अभ्यासपूर्ण असल्याचे मत व्यक्त करतानाच ना. विखे पाटील यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी वस्तू वापरण्याचे आवाहन देशवासीयांना केले आहे. स्थानिक पातळीवर उत्पादीत होणाऱ्या वस्तू स्वराज्य आग्रह त्यांनी केला. त्यांच्या आवाहानाचे प्रतिबिंब बिझनेस एक्स्पो मध्ये प्रामुख्याने दिसून आल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. बिझनेस एक्स्पो मधील खाद्य पदार्थाचा आस्वाद मंत्री विखे पाटील यांनी घेतला.

प्रदर्शनाच्या प्रवेशद्वारातच लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या नदीजोड प्रकल्पाच्या संकल्पनेचे प्रदर्शन तसेच जिल्ह्यातील धरणाची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. मंत्री विखे पाटील यांनी पाहाणी करून संकल्पनेचे कौतुक केले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !