उद्या स्वर्गीय इंदिरा गांधी यांना अमृत उद्योग समूहाच्या वतीने अभिवादन
◻️ संगमनेर कारखान्याचे व्हा. चेअरमन पांडुरंग घुले यांचे नागरीकांना उपस्थित राहण्याचे आवाहन
संगमनेर LIVE | भारताच्या माजी पंतप्रधान तथा आयर्न लेडी स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त अमृत उद्योग समूहाच्या वतीने उद्या शुक्रवार दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ८.३० वा. शक्ती स्थळ अमृतनगर येथे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजीत तांबे, दुर्गाबाई तांबे, रणजितसिंह देशमुख, डॉ. जयश्री थोरात यांच्या उपस्थितीमध्ये अभिवादन करण्यात येणार आहे. अशी माहिती कारखान्याचे व्हा. चेअरमन पांडुरंग घुले यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना पांडुरंग घुले म्हणाले की, स्वर्गीय इंदिरा गांधी यांचे देशाच्या उभारणीत मोलाचे योगदान आहे. पाकिस्तानला धडा शिकवत बांगलादेशची निर्मिती करणाऱ्या इंदिरा गांधी यांनी अनेक धाडसी निर्णय घेतले. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या प्रेरणास्त्रोत असलेल्या इंदिरा गांधी यांचा स्मृतिदिन दरवर्षी कारखान्यावर साजरा करण्यात येतो. यानिमित्त वेगवेगळ्या मान्यवरांची व्याख्याने आयोजित केली जातात. यावर्षी शुक्रवार दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी अभिवादन करण्यात येणार आहे.
दरम्यान या अभिवादन कार्यक्रमासाठी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक, नागरिक व महिला यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सर्व संचालक मंडळ कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले.