स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शत प्रतिशत महायुतीचा संकल्प करा!
◻️ राज ठाकरेना पुढे करून तालुक्यातील मतदारांचा अपमान करण्याचे काम सुरू - आमदार अमोल खताळ
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील जनतेन मागील दिवाळीला आमदार अमोल खताळ यांना विजयी करून महायुतीला मोठी भेट दिली होती. यावेळची भेट म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शत प्रति्या महायुतीचा संकल्प करा. असे आवाहन जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
संगमनेर येथे दीपावलीनिमित्त आमदार अमोल खताळ आणि महायुतीच्या वतीने दीपावली स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मंत्री विखे पाटील यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून संगमनेरी मिसळ आणि जिलबीचा आस्वाद घेवून तालुक्यातील महायुतीच्या पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरीकांना शुभेच्छा देत निवडणुकीला सज्ज होण्याचे आवाहन केले.
मंत्री विखे पाटील म्हणाले की, आमच्या निवडणुका झाल्या आता कार्यकर्त्याच्या निवडणुका आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुकीत गट तट बाजूला ठेवून महायुती जो उमेदवार देईल त्याच्या पाठीमागे उभे राहाण्याचे सांगितले. तसेच तालुक्यात शत प्रतिशत महायुतीला विजयी करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन त्यांनी केले.
आमदार अमोल खताळ यांनी सर्वाचे स्वागत करतांना तालुक्यातील जनतेन विकासाचे बीज प्रजलित करून दिलेली संधी खूप मोठी आहे. त्यांच्या ॠणातून मी कधीही मुक्त होवू शकणार नाही. लोकांनी केलेले परीवर्तन विकासासाठी आहे. आगामी काळात आपल्याला तालुक्यात विकासाची प्रक्रीया पुढे घेवून जायची आहे. यासाठी जनतेची साथ हवी आहे.
निवडणुकीत पराभूत झालेल्यांनी एव्हीएमवर आरडाओरडा सुरू आहे. आता राज ठाकरेना पुढे करून तालुक्यातील मतदारांचा अपमान करण्याचे काम सुरू आहे. पण यापुर्वी बोगस मतदान कोणी कसे घडविले याची संपूर्ण आकडेवारी आपण काढली असून लवकरच जाहीर करणार असल्याचे आ. अमोल खताळ म्हणाले.
दिपावली स्नेहमिलन कार्यक्रमाच्या निमित्ताने शहर आणि तालुक्यातील नागरीक व्यापारी उद्योजक डॉक्टर सहकारी संस्थाचे पदाधिकारी अध्यात्मिक सांस्कृतिक साहीत्यिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्व. आ. शिवाजीराव कर्डीले तसेच स्व. बुवाजी खेमनर यांना श्रध्दांजली वाहून कोणतेही सत्कार सोहळ्याचे आयोजन मंत्री विखे पाटील यांनी रद्द केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता गुणे यांनी केले. याप्रसंगी महायुतीचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.