संगमनेर येथे उद्या शनिवारी 'दिवाळी फराळ स्नेह मिलन'चा भव्य सोहळा!
◻️ पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह डॉ. सुजय विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती!
◻️ आमदार अमोल खताळ यांच्या पुढाकाराने महायुतीचे कार्यकर्ते येणार एकत्र
संगमनेर LIVE | दीपावलीच्या मंगल पर्वाच्या पार्श्वभूमीवर संगमनेर विधानसभा क्षेत्रातील शिवसेना महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यासाठी आमदार अमोल खताळ यांच्या वतीने 'दिवाळी फराळ स्नेह मिलन २०२५' या भव्य कार्यक्रमाचे आयोजन उद्या शनिवार, दि. २५ ऑक्टोबर रोजी करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला राज्याचे जलसंपदा मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व युवानेते डॉ. सुजय विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या स्नेह मेळाव्यास सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक उपस्थित राहावे. असे आवाहन आमदार अमोल खताळ यांनी केले.
या 'दिवाळी फराळ स्नेह मिलन' सोहळ्यात सदिच्छांची देवाणघेवाण करण्यात येणार आहे. तसेच महायुतीच्या माध्यमातून संगमनेरच्या विकासाची दिशा ठरवण्याकरिता तसेच कार्यकर्त्यामध्ये उत्साह आणि समन्वय वाढवण्यासाठी हा 'स्नेह मिलन' कार्यक्रम एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.
हा सोहळा उद्या शनिवार, दिनांक २५ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ठीक १० वाजता शहरातील मालपाणी लॉन्स येथे आयोजित करण्यात आला आहे.
दरम्यान आमदार अमोल खताळ यांनी या निमित्ताने शिवसेना महायुतीतेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सर्वसामान्य नागरिक यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून दिवाळीचा फराळ आणि शुभेच्छांची देवाणघेवाण करण्याचे आवाहन केले आहे.