आरएसएस चा संविधान, तिरंगा आणि ट्रस्ट ॲक्टची प्रत घेण्यास नकार
◻️ वंचित बहुजन आघाडीचे निवेदन डीसीपींनी स्वीकारले
संगमनेर LIVE (छत्रपती संभाजीनगर) | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज औरंगाबाद शहरात 'जन आक्रोश मोर्चा'चे आयोजन करण्यात आले होते.
शहरातील आरएसएसच्या कार्यालयावर हा मोर्चा नेण्यात आला. पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली असतानाही, हजारोंच्या संख्येने नागरिक यात सहभागी झाले आणि मोर्चा यशस्वी झाला.
यावेळी, वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर, राज्य समिती सदस्य अमित भुईगल आणि राज्य समिती सदस्य शमीभा पाटील यांनी थेट उपायुक्त (DCP) यांच्याकडे भारतीय संविधान, तिरंगा ध्वज आणि महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ॲक्टची प्रत सुपूर्द केली.
आरएसएसचा स्वीकारण्यास नकार..
आरएसएसच्या कार्यालयात भारताचे संविधान, तिरंगा आणि महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ॲक्टची प्रत स्वीकारण्यास आज आरएसएस ने स्पष्टपणे नकार दिला. त्यामुळे, औरंगाबादच्या डीसीपी यांनी हे दस्तावेज स्वीकारले.
यावेळी सुजात आंबेडकर यांनी भारताचा तिरंगा ध्वज दिला. अमित भुईगल यांनी भारताचे संविधान दिले. तसेच शमीभा पाटील यांनी महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ॲक्टची प्रत दिली.
दरम्यान या 'जन आक्रोश मोर्चात' हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. या वेळी उपस्थितांनी 'भारतीय संविधान जिंदाबाद', 'आरएसएसचा मुर्दाबाद' अशा जोरदार घोषणा दिल्या.