पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी ‘एक पेड मॉ के नाम’ हा स्तुत्य उपक्रम
◻️ स्वामी नरेंद्राचार्य महाराज वसुंधरा दिंडीचे आमदार खताळ यांनी वृक्षारोपण करून केले स्वागत
संगमनेर LIVE | या कॉक्रीटच्या जंगलात आपण कुठेतरी बाजूला चाललो होतो. मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. पर्यावरणाचा होणारा ऱ्हास थांबविण्यासाठी नाणीज धामचे नरेंद्र महाराज यांनी सुरू केलेला ‘एक पेड मॉ के नाम’ हा अभिनव उपक्रम निश्चितच पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी उपयोगी पडेल. असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला.
नाणीज धाम येथे २१ ऑक्टोबर रोजी नरेंद्र महाराज यांचा जन्मसोहळा होत आहे. त्यानिमित्त उत्तर महाराष्ट्रातून हजारो भाविक भक्त सहभागी असलेली वसुंधरा पायी दिंडीचे २९ सप्टेंबर २०२५ रोजी उत्तर महाराष्ट्र नाशिक उपपीठ येथून प्रस्थान झाले. ही दिंडी संगमनेर येथे आली असता आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी सौ. नीलम खताळ यांनी या दिंडीचे संगमनेर शहरात उत्स्फूर्त स्वागत केले. तसेच चंदनापुरी येथे आमदार अमोल खताळ यांनी सिद्ध पादुकाचे दर्शन घेतले. त्यांच्या हस्ते व उत्तर अहिल्यानगर नगर जिल्ह्यातील भावीक भक्तांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले.
आमदार अमोल खताळ म्हणाले की, ‘एक पेड मॉ के नाम’ ही संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून पुढे आली. त्या संकल्पनेच्या आधारावरती नरेंद्र महाराज यांच्या भक्तांनी पर्यावरणाविषयी जनतेमध्ये जनजागृती करण्यासाठी वसुंधरा पायी दिंडी हा स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे. विधानसभा निवडणुकीत त्यांची कृपादृष्टी झाल्यामुळे माझ्या सारख्या एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलगा तालुक्याचा लोकप्रतिनिधी झाल्याचे सांगितले.
दरम्यान वसुंधरा पायी दिंडीचे संगमनेर येथे सौ. नीलम खताळ यांनी स्वागत करुन “झाडे लावा झाडे जगवा पर्यावरणाचा ऱ्हास थांबवा” हा संदेश या वृक्षदिंडीच्या माध्यमातून देताना, पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी हा उपक्रम उपयोगी पडेल. असा विश्वास व्यक्त केला.