संगमनेर तालुक्यातील १४ विकास कामांना दोन कोटींचा निधी मंजूर

संगमनेर Live
0
संगमनेर तालुक्यातील १४ विकास कामांना दोन कोटींचा निधी मंजूर

◻️ आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्यातून सामाजिक न्याय विभागाच्या निधीला मंजुरी


संगमनेर LIVE | महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना सन २०२५-२६ अंतर्गत संगमनेर तालुक्यातील विविध विकासकामांना दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली. 

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना राबविली जाते. या अंतर्गत संगमनेर तालुक्यातील १४ विकासकामांना मंजुरी देण्यात आली आहे. गावांमध्ये सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक विकासासाठी सभागृह, ग्रंथालय, अभ्यासिका आणि व्यायामशाळा अशा मूलभूत सुविधांच्या उभारणीवर भर दिला जाणार असल्याचे आमदार अमोल खताळ यांनी यावेळी सांगितले. 

मंजूर कामांमुळे संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील वाडी-वस्तीवर विकासाला नवी गती मिळणार आहे. नव्याने उभारण्यात येणाऱ्या सुविधा गावागावातील विद्यार्थी, युवकांसाठी आणि सामाजिक उपक्रमांसाठी उपयोगी ठरतील. या कामांमुळे स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती होऊन ग्रामविकासाची प्रक्रिया अधिक वेगवान होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. राज्य सरकार आणि लोकप्रतिनिधी यांच्या पुढाकारातून समाजविकासाचा वेग वाढला आहे. यानिमित्ताने निधी मंजूर केल्याबद्दल आमदार अमोल खताळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेच्या माध्यमातून समाजाच्या सर्वागीण प्रगतीचा ठोस पाया रचला जात आहे. तालुक्यात ठिकठिकाणी शिक्षण, सांस्कृतिक आणि आरोग्याशी निगडित सुविधा उपलब्ध होणार आहेत. समाजाच्या उन्नतीसाठी शासनाने दिलेला दोन कोटींचा निधी ही फक्त सुरुवात आहे. आगामी काळात आणखी अनेक विकासकामे तालुक्यात आणण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही आमदार अमोल खताळ यांनी दिली.

तालुक्यातील मंजूर विकास कामे..

१) संगमनेर खुर्द गावठाण येथे नवीन अभ्यासिका बांधकाम करणे (१० लाख रुपये)

२) पिंपरणे येथील आंबेडकर नगर येथे नवीन अभ्यासिका बांधकाम करणे (२० लाख रुपये)

३) खांडगाव येथे नवीन सांस्कृतिक सभागृह बांधकाम करणे व परिसर सुशोभीकरण करणे (१० लाख रुपये)

४) तिगाव गावठाण येथे सांस्कृतिक सभागृह बांधकाम करणे व परिसर सुशोभीकरण करणे (१० लाख रुपये)

५) राजापूर येथील आण्णाभाऊ साठे नगर येथे नवीन अभ्यासिका बांधकाम करणे (२० लाख रुपये)

६) हिवरगाव पठार गावठाण येथे सांस्कृतिक सभागृह बांधकाम करणे व परिसर सुशोभीकरण करणे (१० लाख रुपये)

७) मौजे वाघापुर येथील शांती नगर येथे व्यायाम साहित्य पुरविणे (१० लाख रुपये)

८) समनापूर येथील रूपवते वस्ती येथे नवीन अभ्यासिका बांधकाम करणे (२० लाख रुपये)

९) पोखरी हवेली गावठाण येथे सांस्कृतिक सभागृह बांधकाम करणे व परिसर सुशोभीकरण करणे (१० लाख रुपये)

१०) मंगळापूर येथील गायकवाड वस्ती, गावठाण येथे सांस्कृतिक सभागृह बांधकाम करणे व परिसर सुशोभीकरण करणे (१० लाख रुपये)

११) वडझरी बु।। गावठाण येथे सांस्कृतिक सभागृह बांधकाम करणे व परिसर सुशोभीकरण करणे (१० लाख रुपये)

१२) वडगाव पान येथील वीरभद्र नगर येथे नवीन अभ्यासिका बांधकाम करणे (२० लाख रुपये)

१३) घुलेवाडी येथील दादासाहेब रुपवते नगर येथे नवीन व्यायाम शाळा व साहित्य पुरविणे (२० लाख रुपये)

१४) साकुर येथील आंबेडकर नगर येथे नवीन शौचालय बांधकाम करणे (२० लाख रुपये) इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !