उपसा जलसिंचन योजनांवरील स्थगिती उठवून पाणी द्या - बाळासाहेब थोरात

संगमनेर Live
0
उपसा जलसिंचन योजनांवरील स्थगिती उठवून पाणी द्या - बाळासाहेब थोरात

◻️ काकडवाडी येथे छत्रपती शिवराय पुतळा सुशोभीकरण व सेवा सोसायटीचचे लोकार्पण



संगमनेर LIVE | निळवंडे धरण व कालवे आपण पूर्ण केले. हे सर्व जनतेला माहित आहे. मात्र, याचे श्रेय दुसरेच घेत आहे. आपण श्रेयासाठी कधीही काम केले नाही. भोजापुर चारी कामासाठी पाठपुराव्यासह या भागातील गावांसाठी उपसा जलसिंचन योजना आपण केल्या होत्या. विद्यमान सत्ताधाऱ्यांनी त्या रद्द केले असून या योजनांवरील स्थगिती तातडीने उठून पाणी द्या. अशी मागणी करताना महाराजांचा विचार हा जगाला मानवतेचा संदेश देणारा असल्याचे प्रतिपादन कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केले.

तालुक्यातील काकडवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा सुशोभीकरण व सेवा सोसायटीच्या लोकार्पण सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी खासदार भाऊसाहेब वाकचौरे होते. व्यासपीठावर बी. आर. चकोर, शिवसेनेचे अमर कतारी, संपतराव गोडगे, सुभाष सांगळे, अनिल कांदळकर, सखाराम शर्माळे, अनिल घुगे, सरपंच जनार्दन कासार, सुनील कासार, अशोक मुळे, चेअरमन संतोष काळे, व्हा. चेअरमन भाऊसाहेब जगताप, दिलीप शिरसाट, त्रंबक गायकवाड, सचिन गायकवाड, कैलास मुळे, वाल्मीक मुळे, संतोष मुळे, संजय गायकवाड, बाळू कासार, सोमनाथ गांडोळे, नानासाहेब गायकवाड, संतोष ढवळे, बाळा शिरसाट, आदिनाथ झुरळे, केशव शिरसाट, विठ्ठल मुळे, अशोक शिरसाट, सौ. केशरबाई मुळे, सौ अलका मुळे, इंदुबाई ढवळे, मंदा ढवळे, बाबासाहेब गायकवाड, सदाशिव गायकवाड, रभाजी गांडोळे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण जगाचे आराध्य दैवत आहे. महाराजांनी स्वराज्य स्थापन करताना कधीही भेदभाव केला नाही. सर्व जाती धर्माच्या लोकांना समान स्थान दिले. हा मानवतेचा विचार युवकांनी पुढे नेला पाहिजे. काकडवाडी मध्ये होणारे महाराजांचे स्मारक हे जिल्ह्यासाठी आदर्शवत ठरेल असा विश्वास व्यक्त करताना भोजपुर चारीसाठी आपण सातत्याने पाठपुरावा केला. अनेक वेळा पाणी दिले यावर्षी चांगला पाऊस झाला म्हणून लवकर पाणी आले ज्या लोकांना चारी माहिती नव्हती ते आता श्रेय घेऊन पाहत आहेत.

निळवंडे धरण व कालवे आपण पूर्ण केले श्रेय मात्र दुसरी घेत आहे खरे जनतेला माहित आहे. निमोण नान्नज दुमाला पंचक्रोशीतील गावांना भोजपूर सह निळवंडे कालव्यांचे पाणी देण्यासाठी उपसा जलसिंचन योजना आपण मंजूर केल्या होत्या. कालव्यांच्या वरच्या बाजूला पाणी मिळेल याकरता मध्य प्रदेश मधील माधवपूरच्या धरतीवर आपण पॅटर्न राबवण्याचे नियोजित केले होते यासाठी आपले कामही सुरू आहे. मात्र महाविकास आघाडी सरकार बदलले आणि सध्याच्या सरकारने या उपसा जलसिंचन योजना रद्द केल्या. खरे तर पहिला या उपसा सिंचन स्थगिती उठून पाणी द्या. आपण सातत्याने काम केले मात्र काही मंडळी द्वेष पसरवण्याचे काम करत आहे अशा लोकांना वेळीच रोखा असे आवाहन त्यांनी केले.

खासदार भाऊसाहेब वाकचौरे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी सुशोभीकरण करण्याकरता आपण निधी मंजूर केला आहे. याचबरोबर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखालील संगमनेरात सहकार्यातून मोठे काम होत असून काकडवाडी मध्ये झालेली सोसायटीची इमारत ही अत्यंत सुंदर वैभवशाली आहे.

याप्रसंगी ज्ञानदेव काळे सचिव संजय गडाख संपत शिरसाठ रामनाथ शिरसाट कैलास गिरी यांच्यासह गावातील ग्रामस्थ व नागरिक व शिवभक्त युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच जनार्दन कासार यांनी केले सूत्रसंचालन सुनील कासार यांनी केले तर सोसायटीचे चेअरमन संतोष काळे यांनी आभार मानले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !