आमदार खताळ यांनी लोहारे आठवडे बाजारात शेतकऱ्यांशी साधला संवाद
◻️ ग्रामपंचायतीच्या वतीने दर रविवारी लोहारे मिरपूर येथे आठवडे बाजार सुरू
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील लोहारे मिरपूर गावात नुकताच सुरू झालेल्या आठवडे बाजारास आमदार अमोल खताळ यांनी भेट देत शेतकरी आणि व्यावसायिकाशी संवाद साधला. या भेटीदरम्यान त्यांनी अडी - अडचणी जाणून घेतल्या तसेच त्यांना विविध शासकीय योजनांची माहिती दिली.
लोहारे मिरपूर ग्रामपंचायतीच्या वतीने दर रविवारी आठवडे बाजार भरविण्यात येत आहे. या बाजारात परिसरातील शेतकरी आपला शेतमाल थेट विक्रीसाठी आणत असून, गावातच माल विकण्याची सुविधा मिळाल्याने शेतकरी समाधानी असून शेतकऱ्यांचा आत्मविश्वास अन मेहनतीची जिद्द पाहून अभिमान वाटतो.” त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या कृषी योजनांची माहिती दिली.
यावेळी स्थानिक ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी आमदार खताळ यांच्या भेटीबद्दल समाधान व्यक्त केले असून, अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत असल्याचे आमदार अमोल खताळ यांनी सांगितले. याप्रसंगी त्यांच्या समवेत महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.