उंबरी बाळापूर येथे महामानव डॉ. आंबेडकर यांच्या स्मारकासाठी तरुणाईचा पुढाकार
◻️ स्मारक समितीच्या अध्यक्षपदी रिपाइंचे तालुकाध्यक्ष आशिष शेळके यांची निवड
संगमनेर LIVE | आधुनिक भारताचे निर्माते आणि भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य आणि प्रेरणादायी स्मारक उभे करण्याचा संकल्प संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर येथील बाबासाहेबांच्या विचारांचे पाईक असलेल्या तरुणाई सह समाज बांधवांनी घेतला आहे.
याबाबत नुकतीच एक बैठक पार पडली. यामध्ये स्मारक समितीच्या अध्यक्षपदी रिपाइंचे (आठवले) तालुकाध्यक्ष आशिष प्रभाकर शेळके यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
दरम्यान याप्रसंगी अॅड. रवींद्र शेळके, रविंद्र बाजीराव शेळके, अशोक शेळके, राजू शेळके, गुलाब शेळके, अनिल शेळके (पत्रकार), विजय शेळके, संदीप रोकडे, डॅनियल गायकवाड, विनायक शेळके, रोहित शेळके, प्रतीक शेळके, सौरभ शेळके, संग्राम शेळके, पंकज शेळके, बाबासाहेब शेळके, सनी शेळके, सनी लोंढे, सोनू शेळके, फिलिप शेळके, अविनाश शेळके, अनिल बर्डे, दादू बर्डे, जॉनी शेळके, पोपट शेळके, सचिन शेळके, ऋतिक शेळके, सागर शेळके आदी उपस्थित होते.